नागपूर | राज्यातील भीषण दुष्काळाचं योग्य नियोजन न केल्याचा राज्य सरकराला धारेवर धरणाराच नेता एका खासगी कार्यक्रमात झिंगाट डान्स करताना पाहायला मिळाला आहे.
वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील काँग्रेसचे आमदार अमर काळे हे राज्यातील दुष्काळ विसरुन एका लग्नाच्या कार्यक्रमात डान्स करताना दिसले. त्यांच्या या झिंगाट डान्सचा व्हीडिओ चांगलाचं व्हायरल झाला आहे.
जनतेसमोर राज्य सरकारवर टीका आणि खासगी आयुष्यात असा डान्स करणाऱ्या अमर काळे यांच्यावर सर्वत्र टीका होत आहे.
दरम्यान, घरात मीच मोठा आहे. बहिणींच्या आग्रहाखातर मला नाच करावा लागला. मला दुष्काळाचीही जाण आहे, असं अमर काळे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
-रविशंकर प्रसाद यांच्याकडून तिहेरी तलाकविरोधी विधेयक लोकसभेत सादर
-छत्रपती संभाजीराजे कडाडले; म्हणतात आरक्षण गेलं खड्ड्यात आधी…
-मनसेने ‘या’ कारणासाठी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार
-मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी
-छगन कमळ बघ, शरद गवत आण; मुख्यमंत्र्यांचं अजित पवारांना जशास तसं उत्तर
Comments are closed.