बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

या आमदाराच्या घरी कोरोनाचा कहर; एकामागोमाग एक 18 जण कोरोना पॉझिटिव्ह

जयपूर | कोरोना विषाणू कसा धुमाकूळ घालू शकतो, याचा प्रत्यय नुकताच राजस्थानमध्ये आला आहे. काँग्रेसचे आमदार गिरीराज मलिंगा यांच्या कुटूंबातील चक्क १८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर येताच परिसरात एकच खळबळ माजली आहे.

गिरीराज मलिंगा धौलपूरच्या बारी मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. एकट्या घरातीलच तब्बल १८ जण कोरोना बाधीत सापडल्यानं आमदारांच घर कोरोनाचं नवं हाॅटस्पाॅट झालं. असं म्हणल्यास वावगं ठरणार नाही.

या रुग्णांमध्ये मलिंगा यांच्या पत्नीचाही समावेश आहे. सध्या या सर्व संक्रमित रूग्णांना घरातच होम क्वारंटाईन करून ठेवण्यात आलं आहे. सध्या राजस्थानमधील कोरोना संक्रमितांचा आकडा १५ हजारांच्या घरात जाऊन पोहचला असून राज्यातील ३४९ जणांचा कोरोनानं बळी घेतला आहे.

मलिंगा काँग्रेस पक्षाच्या वतीने आजतागायत ३ वेळा विधानसभेत निवडून आले आहेत. नववीची खोटी मार्कशीट दाखवून दहावीची परीक्षा दिल्याचा आरोप मलिंगा यांच्यावर लावण्यात आला होता. या मार्कशीट घोटाळ्यामुळे मलिंगा चांगलेच चर्चेत होते.

ट्रेंडिंग बातम्या-

तुकाराम मुंढेंच्या आयुष्यात पहिल्यांदाच गैरव्यवहाराचा आरोप, महापौरांनी उचललं मोठं पाऊल!

आता लग्न आणखी ‘मंगल’ होणार, राज्य सरकारकडून या गोष्टीला परवानगी

महत्वाच्या बातम्या-

संजय राऊतांनी शिवसेनेचे सोडून काँग्रेसचे प्रवक्तेपद स्वीकारले का?; विखे-पाटलांचा पलटवार

अशोक चव्हाणांची हकालपट्टी करा; मराठा ठोक क्रांती मोर्चाची मागणी

पाकिस्तानी खेळाडूंच्या मानगुटीवर कोरोना, या खेळाडूंना झाली लागण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More