बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शिवसेनेने आम्हाला धोका दिला, काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा DNA वेगळाच”

मुंबई | महाविकास आघाडी सरकार जास्त काळ टिकणार नाही, असं भाजपकडून वारंवार सांगण्यात येत आहे. महाविकास आघाडी सरकार 2 महिने टिकेल, 6 महिने टिकेल, दिवाळीपर्यंत टिकेल असं भाजप वारंवार सांगताना दिसत आहे. त्यातच आता भाजपचे राष्ट्रीय महासचिव आणि महाराष्ट्रचे प्रभारी सी टी रवी यांनी भाष्य केलं आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा डीएनए वेगळा आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेना भाजपसोबत एकत्र लढली. या निवडणुकीत लोकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाच्या बाजूने कौल दिला होता. मात्र त्यानंतर देखील शिवसेनेने भाजपला धोका देत महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. त्याचबरोबर शिवसेनेने मतदारांना देखी धोका दिला असल्याचं सी टी रवी यांनी म्हटलं आहे.

आघाडी सरकार किती दिवस राहतंय हे आम्ही पाहतोय, हे सरकार जास्त दिवस टिकेत असं वाटत नाही, असंही सी टी रवी म्हणाले आहेत. आम्ही राज्यभर फिरतोय. लोकांमध्ये या सरकारविरूद्ध संतापाचं वातावरण आहे. आता जनताच या सरकारला उत्तर देईल, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान, कल्याणमधील भाजपच्या पक्ष संघटनात्मक बैठकीत सी टी रवी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. यावर आता शिवसेना काय उत्तर देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“प्रभू श्रीराम संपूर्ण जगाचे, ते फक्त भाजप आणि आरएसएसचे नाहीत”

‘मोदींजीना बोलवा, तरच मी लस घेईल’; पठ्ठ्याच्या मागणीनं अधिकाऱ्यांना फुटला घाम

“मोदीजी म्हणतील, मैं संजय राऊत के सामने रहता हूँ”

”उद्धव ठाकरेंना वाटेल तोपर्यंतच महाविकास आघाडी सरकार टिकेल”

मी स्वतःला भाग्यवान समजतो…, शिक्षण क्षेत्रात डॉ. राजेंद्र विखे पाटील यांचे काम उल्लेखनीय – चंद्रकांत पाटील

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More