बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक नसतील तर…’; शशी थरूर यांचं मोठं वक्तव्य!

नवी दिल्ली | भारतात काँग्रेस आणि भाजप दोन मुख्य राष्ट्रीय पक्ष आघाडीवर आहेत. मात्र काँग्रेस पक्षाला कायमस्वरूपी अध्यक्षाची गरज असल्याची अनेक काँग्रेस नेत्यांनी मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते शशी थरूर यांनी काँग्रेस पक्षाबद्दल महत्वाचं वक्तव्य केलं आहे. ते केरळ येथील इडुक्की जिल्ह्यात माध्यमांशी बोलत होते.

सध्या काँग्रेस पक्षाला कायम स्वरूपी अध्यक्षाची गरज आहे. सोनिया गांधी या काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा आहेत. परंतु सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदापासुन मुक्त करा, अशी मागणी करत आहेत. त्यामुळे सध्या काॅंग्रेसला नवसंजीवनी देण्याची गरज असल्याचं शशी थरूर यांनी सांगितलं आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदाबाबत बोलताना राहुल गांधी जर अध्यक्षपदासाठी इच्छुक नसतील तर आम्हाला दुसरा अध्यक्ष शोधावा लागेल .राहुल गांधींनी काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहावं अशी आमची सर्वांची इच्छा आहे, असं देखील शशी थरूर म्हणाले.

दरम्यान, सोनिया गांधी यांनी काँग्रेस पक्षाचे यशस्वी नेतृत्व केलं आहे. तसेच काँग्रेसच्या जुन्या जाणत्या नेत्यांच्या मागणीचा पक्ष लवकरच विचार करेल. राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसला कायम स्वरूपी अध्यक्ष नाही. त्यामुळे काँग्रेसला सध्या मजबुत नेतृत्वाची गरज आहे, असंही शशी थरूर यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

दिलासादायक! राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत दिवसेंदिवस होतेय लक्षणीय घट

भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी ‘हे’ पाच महारथी आघाडीवर, जाणून घ्या!

पुणे कोरोना अपडेट, वाचा आजची आकडेवारी!

नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थींनी अफगाण मुलींबाबत केलं मोठं वक्तव्य; म्हणाले…

धक्कादायक! महिलेच्या गळ्यात अडकली कोरोना चाचणीच्या कीटमधील कांडी, त्यानंतर….

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More