नागपूर महाराष्ट्र

फडणवीस सरकारची कोंडी करण्यासाठी काँग्रेसने आखली रणनीती

नागपूर | दुष्काळाच्या मुद्द्यावरुन सरकारची कोंडी करण्यासाठी काँग्रेसने रणनीती आखली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी विदर्भातील दुष्काळी दौऱ्यासाठी काँग्रेस आमदार आणि पदाधिकाऱ्यांची एक समिती नेमली आहे.

लोकसभा निवडणुकीमुळे सरकारचं दुष्काळाकडे दुर्लक्ष झालं आहे. त्यामुळे विरोधीपक्ष सातत्याने दुष्काळाच्या प्रश्नावर सरकारला लक्ष्य करत आहे.

विधानसभा डोळ्यासमोर ठेवून विरोधी पक्षांनी सरकारला घेरण्याचं ठरवलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने राज्यपालांची भेट घेऊन दुष्काळावर तात्काळ उपाययोजना करण्याचे सुचविले आहे.

दरम्यान, राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून या मुद्द्यावरुन विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत.

महत्वाच्या बातम्या

-मुख्यमंत्र्यांनी फोनवरुन दुष्काळाचा आढावा घेण्यापेक्षा राज्यभरात फिरावं; पवारांचं टीकास्त्र

-प्रियकर प्रेयसीला म्हणतो, तुझ्यामुळे नापास झालो… माझे फीचे पैसे परत कर

-“दहशतवाद्यांना मारण्याआधी जवानांनी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी का?”

-भाजपचे आक्रमक प्रवक्ते संबित पात्रांना सिद्धूंनी दिली बेडकाची उपमा

-‘आता कोणी दम देत नाही…’; मातृदिनी नानांची भावूक पोस्ट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या