Top News

‘भारताच्या जागतिक धोरणाची लक्तरे झालीयेत’; राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

नवी दिल्ली | इराणने भारताला मोठा झटका दिला असून चाबहार ते जाहेदानपर्यंत रेल्वे मार्ग उभारण्याच्या प्रकल्पातून बाहेर काढलं आहे. यावरुन काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

भारताच्या जागतिक धोरणाची लक्तरे झालीयेत अशा शब्दांत राहुल गांधी यांनी टीका केली आहे. आपली ताकद आणि सन्मान गमावत असल्याचंही राहुल गांधींनी म्हटलं आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

भारताच्या जागतिक धोरणाची लक्तरे झाली आहेत. प्रत्येक ठिकाणी आपण आपली ताकद आणि सन्मान गमावत आहोत. भारत सरकारला काय करायचं याची काहीच कल्पना नाही, असं ट्विट राहुल गांधींनी केलं आहे.

चाबहार ते जाहेदानपर्यंत रेल्वे मार्ग उभारण्यासाठी करार करण्यात आल्यानंतर चार वर्षांनी इराणने भारताला या प्रकल्पातून बाहेर काढलं आहे. अफगाणिस्तान सीमारेषेलगत हा रेल्वे मार्ग उभारला जाणार होता. भारताकडून हा प्रकल्प सुरु करण्यासाठी तसंच निधी मिळण्यास विलंब होत असल्याचं इराण सरकारने सांगितलं आहे. यावरून राहुल गांधींनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय.

 

महत्वाच्या बातम्या-

…म्हणून 25 वर्षीय महिलेनं महिला पोलिसाचा हात पिरगळला; महिलेला अटक

आता पूर्वीच आयुष्य कधीच जगता येणार नाही; WHOचा धक्कादायक इशारा!

सचिन पायलट भाजपमध्ये प्रवेश करणार का?; केला सर्वात मोठा खुलासा…

महिला पोलिसानं पती सांगून दुसऱ्याच पुरुषाला स्वतःसोबत केलं क्वारंटाईन; त्याच्या पत्नीनं…

…तर ते पद काय कामाचं?; सचिन पायलट यांनी केला मोठा खुलासा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या