देश

अटलजी ‘महाभेसळी’चं सरकार चालवायचे काय?; काँग्रेसचा मोदींवर पलटवार

मुंबई | लोकसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस महाभेसळीचं सरकार आणू पाहत आहे, अशी टीका केली होती. यावर काँग्रेसने आता जोरदार पलटवार केला आहे.

महाआघाडीचं नेतृत्व करुन 3 वेळा सरकार स्थापन करणाऱ्या माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपायी यांनी महाभेसळीचं नेतृत्व केलं होतं, असं म्हणायचं काय, असा सवाल काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी केला आहे.

आज वाजपायींचा अंतरात्मा रडत असेल. 1996,1998 आणि 1999 साली अटल बिहारी वाजपायींनी महाआघाडीचं सरकार चालवलं होतं, असंही ते म्हणाले आहेत.

मोदी एनडीएचं नेतृत्व करतात. एनडीएमध्ये 40-42 पक्ष आहेत. त्यानुसार मोदी महाभेसळीचे म्होरके ठरतात, असंही तिवारी म्हणाले आहेत. 

महत्वाच्या बातम्या-

विधानसभा आणि लोकसभा एकत्र होतील का?, विनोद तावडे म्हणाले…

‘काळे पान! बाके बडवून सत्य मरेल काय?’, शिवसेनेचा ‘राफेल’वरुन निशाणा

शरद पवारांनी या वयात लोकसभा लढवू नये; भाजप करेल पराभव- चंद्रकांत पाटील

पुणतांबा अन्नत्याग आंदोलनकर्त्या मुलींच्या उपोषणावर पोलिसांची कारवाई!

“राफेल करार हवाई दल बळकटीकरणासाठी की गाळात बुडालेल्या उद्योगपतीच्या बळकटीकरणासाठी?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या