बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कॉंग्रेसने सीएम पदाचा आग्रह धरावा, अन्यथा राज्य सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा”

मुंबई | सध्या राजकीय वर्तुळात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडताना दिसत आहेत. एकिकडे विरोधी पक्षातील नेते आणि सत्ताधारी पक्षातील नेते यांच्यात आरोप प्रत्यारोपाची खेळी रंगली असतानाच दुसरीकडे महाविकास आघाडीमधील अंतर्गत कलह देखील चव्हाट्यावर येताना दिसत आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त केल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालेली आहे.

नाना पटोले यांनी मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त करताच अनेक नेत्यांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देखील या मुद्यावर भाष्य केलं आहे. आठवले यांनी यासंबंधित एक ट्वीट केलं आहे.

फक्त इच्छा व्यक्त करून चालणार नाही तर काँग्रेसने सीएम पदाचा आग्रह धरला पाहिजे. काँग्रेसने पाठिंबा काढला तर महाविकास आघाडी सरकार पडेल. काँग्रेसने सीएम पदाचा आग्रह धरला पाहिजे. जर त्यांना सीएम पद दिले जात नसेल तर काँग्रेसने राज्य सरकारचा पाठिंबा काढावा. असे माझे नाना पटोले यांना आवाहन आहे, असं रामदास आठवले ट्वीट करत म्हणाले आहेत.

दरम्यान, नाना पटोले यांनी नुकतंच विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढेल. तसेच मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनण्यास त्यांची तयारी असल्याची इच्छा व्यक्त केली होती. नाना पटोले यांनी मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त करताच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेच 5 वर्ष मुख्यमंत्री राहतील, असं म्हणत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे.

थोडक्यात बातम्या – 

आनंदाची बातमी! सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली ‘ही’ नवी लस कोरोना व्हेरिएंट्सवर 90% प्रभावी

छत्रपती शाहू महाराज आणि अजित पवारांच्या लक्षवेधी भेटीनंतर शाहू महाराज म्हणाले…

राज ठाकरे यांच्या 53व्या वाढदिवसानिमित्त ‘या’ शहरात मिळतंय 53 रुपयांत एक लिटर पेट्रोल

“हिला कोणीतरी आवरा”, योगा व्हिडीओंमुळे राखी झाली ट्रोल

उद्धव ठाकरे 5 वर्ष मुख्यमंत्री राहतील? सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More