बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“करुणा शर्मांनी दिलेला मजकूर प्रकाशित करणं न्यायालयाचा अवमान”, मुंडेंच्या वकिलांचं माध्यमांना पत्र

मुंबई | राष्ट्रवादीचे आमदार आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा कौटुंबिक वाद आता आणखी पेटताना दिसत आहे. करूणा शर्मा यांनी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. मात्र, परळीत पोहचल्यानंतर पत्रकार परिषदेपूर्वी त्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केलं गेलं. त्यानंतर एकच खळबळ उडाल्याचं पहायला मिळालं होतं. त्यावर आता धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी माध्यमांंना पत्र लिहलं आहे.

करूणा शर्मा यांनी केलेल्या आरोपानंतर परळीत पत्रकार परिषद घेत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यात त्यांनी विविध काॅल रेकाॅर्ड, व्हाॅट्सअप चॅट आणि इतर साहित्य प्रसिद्ध करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. परंतु हे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ठ आणि संवेदनशील असल्यानं काहीही प्रसिद्ध करण्यास न्यायालयाने निर्बंध घातले आहेत, असं धनंजय मुंडे यांचे वकिल सुषमा सिंह यांनी सांगितलं आहे.

करूणा शर्मा यांनी त्यांच्या जवळ असलेले कोणतेही काॅल रेकाँर्ड किंवा इतर साहित्य प्रसिद्ध केल्यास तो उच्च न्यायालयाचा अवमान ठरेल, असंही सुषमा सिंह यांनी पत्रात म्हटलं आहे. करुणा शर्मा यांनी कोणतेही साहित्य प्रसिद्ध करू नये. तर माध्यमांनी देखील असे साहित्य प्रसिद्ध करू नये, असे केल्यास देखील तो न्यायलयाचा अवमान ठरतो, असंही पत्राद्वारे धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी सांगितलं आहे.

दरम्यान, सध्या हे प्रकरण उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहे. अशा प्रकारचे साहित्य प्रसिद्ध केल्यास याचा परिणाम प्रकरणाच्या निकालावर होऊ शकतो, असंही वकिल सुषमा सिंह यांनी पत्रात लिहलं आहे.

थोडक्यात बातम्या-

पत्रकार परिषदेपूर्वी करूणा शर्मा मुलासह स्थानबद्ध; परळीत तणावाचे वातावरण

‘… त्यांनी थोडसं तारतम्य बाळगावं’; शरद पवारांचा ‘त्या’ नेत्यांना सल्ला

‘डिवचू नका नाहीतर सोडणार नाही’; शिवसेनेचा राष्ट्रवादीला थेट इशारा

मोठी बातमी! रवी शास्त्री यांना कोरोनाची लागण; भारतीय संघातील ‘हे’ तीन जण विलगीकरणात

आंदोलन करायचं असेल तर कोरोना विरोधात करा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More