Top News देश

‘निवडणुकीत पुरुष नेत्यांशी संपर्क असेल तरच महिलांना तिकीट’; राष्टीय महिला आयोगाच्या अध्यक्षांचं वक्तव्य

हैदराबाद | महिलेला कोणतीही निवडणूक लढवायची असल्यास तिचा पुरुष नेत्याशी संपर्क असणं गरजेचं आहे. असं असेल तरच महिलांना निवडणूक लढवण्यासाठी तिकीट दिलं जात असल्याचं वक्तव्य राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी केलं आहे.

हैदराबादमध्ये मौलाना आझात नॅशनल उर्दू महाविद्यालयाच्या महिला अभ्यास केंद्राने आयोजित केलेल्या एका वेबिनारमध्ये त्या बोलत होत्या.

ज्या व्यक्तिची प्रतीमा मलीन झालेली असते. ज्यांच्यावरोधात गंभीर आरोप असतात. अशा उमेदवारांना विविध पक्षांकडून आवर्जून तिकीट दिले जातं. मात्र तेच तिकीट एखाद्या महिलेला द्यायला राजकीय पक्षांना द्यावंसं वाटत नसल्याचं रेखा शर्मा म्हणाल्या.

दरम्यान, महिलांना निर्णय घेण्याचा अधिकार संसदेत आणि विधिमंडळात असणं आवश्यक आहे. अन्यथा त्या फक्त घरातील काम करत राहतील. जर महिलांना तिकीट द्यायचं झालं तर महिला निवडणूक जिंकू शकेल का?, असा प्रश्न उपस्थित करत डावललं जात असल्यातं शर्मा यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

कलियुगातील संजीवनी मुंबईत आली- महापौर किशोरी पेडणेकर

भंडारा दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना राज्यपालांकडून प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत!

धनंजय मुंडेंच्या प्रकरणावर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

…यावरून शेतकरी कोणाच्यातरी सांगण्यावरून आंदोलनासाठी बसले हे स्पष्ट होतं- हेमा मालिनी

“मुस्लिम चार विवाह करतात, धनंजय मुंडेंनी दोन केले तर काय बिघडलं?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या