देश

‘कोरोना लसीमुळे तुम्ही नपुंसक देखील होऊ शकता’; या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

नवी दिल्ली | समाजवादी पार्टीचे मिर्झापूरचे विधानपरिषद सदस्य आशुतोष सिन्हा यांनी कोरोना लसीविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

कोरोना वॅक्सीनमध्ये काहीतरी असं असू शकतं, ज्यामुळे नुकसान होईल. उद्या लोकं म्हणतील वॅक्सीन लोकसंख्या कमी करण्यासाठी/मारण्यासाठी दिलं गेलं आहे. तुम्ही नपुंसक देखील होऊ शकता. काहीपण होऊ शकतं, असं खळबळजनक वक्तव्य आशुतोष सिन्हा यांनी केलं आहे.

सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी आम्ही भाजपच्या वॅक्सीनवर विश्वास ठेवू शकत नाही, असं म्हटलं होतं. यावरही आशुतोष सिन्हा यांनी प्रतिक्रिया दिली.

अखिलेश यादव यांनी वॅक्सीन संदर्भात केलेल्या विधानाबद्दल आपणास माहिती नाही. पण जर त्यांनी काही म्हटलं असेल तर यामध्ये गंभीरता नक्कीच असेल, असं देखील आशुतोष सिन्हा म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

‘…नाही तर मी राजीनामा देईल’; सुजय विखे पाटील भडकले

‘नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचं नाही तर…’; मनसेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणात कोणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही- जयंत पाटील

“सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर…”

तो स्कूटर घेऊन गल्लीबोळात हिंडत होता; स्कूटरमध्ये निघाली ‘ही’ धक्कादायक गोष्ट!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या