बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मोहनदास करमचंद गांधीनी सत्यानाश केला’; कालीचरण महाराजाचं संतापजनक वक्तव्य

अकोला | छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chatrparti Shivaji Maharaj) पुतळ्याचा अवमानावरून पेटलेला वाद आता कुठे शांत होत होता. त्यातच आता एकाने थेट राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mohandas karamchand Gandhi) यांच्याबाबत एक संतापजनक वक्तव्य केलं आहे. अकोल्याचे कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) नेहमीच काही ना काही वादग्रस्त वक्तव्य करत असतात. मात्र यावेळी त्यांनी एका कार्यक्रमात थेट महात्मा गांधी विरोधात वादग्रस्त वक्तव्य केलंय.

छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे धर्मसंसद पार पडली होती. या धर्मसंसदेत कालीचरण महराजांनी ही गरळ ओकली आहे. मोहनदास करमचंद गांधीनी सत्यानाश केला. नथुराम गोडसे यांचे त्यांना मारल्याबद्दल लक्ष लक्ष धन्यवाद. काही जखमांचे वेळीच ऑपरेशन नाही झालं तर पुढे त्याचा कॅन्सर होतो, असं कालीचरण महाराजांनी म्हटलं आहे.

कालीचरण महाराजांची असे अकलेचे तारे तोडण्याची ही पहिलीच वेळ नाही. तर याआधीही त्यांनी कोरोनावरून बोलतान आपल्या बुद्धीचं प्रदर्शन केलं आहे. कोरोना हा फर्जीवाडा आहे. कोरोनाच्या नावाखाली डॉक्टरच लोकांना मारत आहेत आणि त्यांच्या अवयवांची तस्करी करत आहेत. हे लोक 12 हजार वर्षे नरकात सडतील, असं कालीचरण महाराजांनी म्हटलं होतं.

दरम्यान, कालीचरण महाराज हे लोकांमध्ये चांगलेच प्रसिद्ध आहेत. अभिनेते अनुपम खेर यांनीही एकदा त्यांचा व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये ते शिवतांडव स्तोत्र गाताना दिसत होते. अनुपम खेर यांनी तो व्हिडीओ शेअर करून कालीचरण महाराजाचं कौतुक केलं होतं. त्यानंतर कालीचरण महाराज चागंलेच प्रसिद्ध झाले आहेत.

 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

थोडक्यात बातम्या-

…अन् खासदार नवनीत राणा महिलांसोबत धावू लागल्या; पाहा व्हिडीओ

विधानसभा अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार?, काँग्रेसमधील घडामोडींना वेग

मोदी सरकारची भन्नाट योजना, मिळणार तब्बल 36,000 रूपये

JIO ग्राहकांसाठी खुशखबर! नववर्षाआधी आणला ‘हा’ भन्नाट प्लॅन

“जीन्स घालणाऱ्या मुलींना मोदी आवडत नाहीत, फक्त ‘त्या’ महिलांवरच…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More