बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाबाधित चुलत भावाच्या अंगावर थुंकल्याचा आरोप, बीडमधील घटनेनं खळबळ

बीड | देशात कोरोनाने प्रचंड थैमान घातलं आहे. कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून बेड्स, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाला आहे. या कारणामुळे कोरोनाचे सौम्य लक्षणं असलेल्यांना होम क्वारंटाईन करुन त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. त्यातच आता काही धक्कादायक घटना समोर येत आहेत. कोरोनाबाधीत रुग्णाने स्वतःच्या चुलत भावाच्या तोंडावर थुंकून त्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात हा प्रकार घडला आहे. सारुकवाडी येथील रहिवासी असलेले सुभाष फुंदे आणि त्याची आई कुसुम फुंदे दोघं कोरोनाबाधित आहेत. त्यामुळे त्यांना घरातच आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. दरम्यान काल कोरोनाबाधित रुग्ण सुभाष फुंदेचा चुलत भाऊ दीपक फुंदे आणि त्याचे चुलते श्रीराम फुंदे शेतात पळाट्या गोळा करत होते तसेच कोरोनाबाधित सुभाष देखील शेतात नांगरणी करत होता.

सुभाष शेतात नांगरत असताना त्याचा चुलत भाऊ दीपकने तू आमच्या मालकीचं शेत नांगरु नको, तुझ्याच शेताची नांगरणी कर, असं सांगितलं. यावरून दोघांमध्ये वादाला सुरुवात झाली. यानंतर संतापलेल्या सुभाषनं आपल्या तोंडाचा मास्क काढला आणि तो चुलत भाऊ दीपकच्या अंगावर थुंकला. यावेळी आरोपी सुभाषची पत्नी उषा, आई कुसुम आणि वडील बळीराम तिघंही धावत आले आणि त्यांनी दीपक आणि त्याचे वडिल श्रीराम फुंदे या दोघांना मारहाण केल्याचा आरोप आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची माहिती श्रीराम फुंदे यांनी केज पोलीस ठाण्यात देऊन तक्रार नोंदवली आहे. श्रीराम फुंदे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी बळीराम फुंदे, सुभाष फुंदे, कुसुम फुंदे आणि उषा फुंदे या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

थोडक्यात बातम्या-

कोरोना संकटात भारताला ‘या’ जवळच्या मित्रदेशाने दिला मदतीचा हात, करणार ही मोठी मदत

कोंबड्या चोरुन नेल्याची अफवा, पुण्यात आरोपीनं केला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार

लस घेताना पोरीची नाटकं पाहून डॉक्टर जाम भडकले, व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

कोरोनाकाळात यशराज फिल्म्सचा मदतीचा हात, ‘या’ 30 हजार लोकांसाठी मोफत लसीकरणाचा निर्णय

“लोकशाही संपली असं जाहीर करा नाहीतर चंद्रकांत पाटील यांनी न्यायालयाची माफी मागावी”

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More