शहरी भागातील एक तृतीयांश लोकांच्या शरिरात कोरोना अँटीबॉडी; सिरो सर्व्हेतून धक्कादायक माहिती समोर
हैदराबाद | कोरोना महामारीनं देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत शहरी भागांना झोडपून काढलं होतं. मुंबई आणि पुण्यासारख्या शहरात कोरोनाने मोठं आरोग्य संकंट उभं केलं होतं. त्यानंतर दुसऱ्या लाटेत शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात देखील कोरोना रूग्णसंख्या वाढल्याचं पाहायला मिळालं. पण आता शहरी भागात रूग्णसंख्या आटोक्यात येताना दिसत आहे. त्यातच आता एका सिरो सर्व्हेमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याचा एक अहवाल आता समोर आला आहे.
डिसेंबर 2020 पर्यंत देशातील बारा शहरांमध्ये करण्यात आलेल्या सिरो सर्वेक्षणात 31 टक्के लोकांमध्ये कोरोना विषाणू अँटीबॉडीज सापडल्या आहेत. याबाबत करण्यात आलेल्या चाचणीमध्ये कोरोना विषाणू अँटीबॉडीसाठी 31 टक्के लोक पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं आहे. या सर्वेक्षणात पुण्यासह देशातील इतर बारा शहरांचा देखील समावेश आहे.
संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेत पॉझिटिव्हिटीचा दर 31 टक्क्यांहून बराच जास्त असू शकतो, असा दावाही करण्यात आला आहे. सर्वेक्षणाच्या ऑडिट अहवालानुसार या अभ्यासात 4.4 लाख नमुन्यांचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली होती. विशाखापट्टणममध्ये सिरो सर्वेक्षणांतर्गत नमुने घेतले त्यांच्यापैकी 36.8 टक्के लोकांमध्ये कोरोना विषाणू अँटीबॉडीज सापडल्या आहेत.
दरम्यान, पुण्यात सर्वाधिक 69 टक्के सिरो पॉझिटिव्हिटी आढळली आहे, महिलांमध्ये पॉझिटीव्हीटीचा दर हा 35 टक्के होता, तर पुरुषांमध्ये तो 30 टक्के होता. ज्या भागातील लोकांना लहानपणी देवी रोगावरील लस देण्यात आली होती, अशा लोकांमध्ये हा दर कमी आढळला आहे, असं IMAचे अध्यक्ष राजीव जयदेवन यांनी सांगितलं आहे.
थोडक्यात बातम्या-
राज्याला मदत मिळवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी केंद्राला पत्र लिहावं- रोहित पवार
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या पत्रानंतर अखेर रामदेव बाबांकडून वक्तव्य मागे!
माणुसकीचं नातं कसं असावं हे निलेश लंकेंनी दाखवलं- जयंत पाटील
कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतरही पगार देणार, घर आणि मुलांच्या शिक्षणाचा सर्व खर्च टाटा उचलणार
Comments are closed.