नवी दिल्ली | 26 वर्षीय डॉ. अनस मुजाहिद यांचा काही दिवसांपूर्वीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ते दिल्लीतल्या जीटीबी रुग्णालयात सेवा देत होते. कोरोनाचं निदान झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अनस यांचा जीव गेला. यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अनस मुजाहिद यांच्या घरी जाऊन कुटुंबाची भेट घेतली आहे.
अनस यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन मुख्यमंत्री केजरीवालांनी 1 कोटी रुपयांचा धनादेश दिला. त्यांचं सांत्वन केलं. माझा मुलगा अनस 9 मे रोजी हे जग सोडून गेला. लोकांची सेवा करता करता त्याचं निधन झालं. त्याच्या निधनाचं दु:ख खूप मोठं आहे. पण तो देशाच्या कामी आला याचं समाधान आहे. माझी दोन मुलं इंजिनीयर आहेत. एक मुलगी बीएमएसच्या पहिल्या वर्षाला आहे. अनसप्रमाणेच माझी सगळी मुलं, माझं संपूर्ण कुटुंब देशाच्या कामी येवो, असं डॉ. अनस मुजाहिद यांच्या वडिलांनी म्हटलं.
डॉ. अनस मुजाहिद यांच्या वडिलांचे शब्द ऐकून अरविंद केजरीवाल गहिवरले. अनस यांच्या मृत्यूला 10 दिवस झालेत. पण तरीही त्याचे वडील माझं संपूर्ण कुटुंब देशाच्या कामी यावं अशी इच्छा व्यक्त करत आहेत. मी त्यांना मनापासून सलाम करतो, असं केजरीवाल म्हणाले.
दरम्यान, अनस यांचं वय जाण्याचं नव्हतं. पण आपला तरुण मुलगा गमावूनही त्याच्या वडिलांचे विचार अतिशय कौतुकास्पद आहेत, असंही अरविंद केजरीवाल यांनी म्हणाले.
कोरोना काल में दिन-रात मेहनत कर रहे स्वास्थ्य कर्मी ही हमारे हीरो हैं, डॉ.अनस मुजाहिद GTB अस्पताल में डॉक्टर थे। कोरोना मरीज़ों का इलाज करते हुए मात्र 26 वर्ष की उम्र में शहीद हो गए
उनके परिवार का ख़्याल रखना हमारा फ़र्ज़ है, आज उनके परिवार से मिलकर ₹1 करोड़ की सहायता राशि दी। pic.twitter.com/DWOflD0bMb
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) May 22, 2021
थोडक्यात बातम्या-
‘तिसऱ्या लाटेची भिती बाळगू नका’; बालरोगतज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला
‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’ या वक्तव्याशी आमचा संबंध नाही; सीरमचं स्पष्टीकरण
घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळलेल्या महिलेच्या हत्येचं गूढ उलगडलं; धक्कादायक कारण आलं समोर
पदोन्नतीच्या आरक्षणावरून ठाकरे सरकारमध्ये ठिणगी; ‘या’ काँग्रेस मंत्र्याचा ठाकरे सरकारला इशारा
तरणीबांड मुलं एका तासाच्या अंतराने गेली, वडिलांनीही जीव सोडला!
Comments are closed.