बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

करावं तेवढं कौतुक कमी! साखरपुड्यात लग्न उरकून उरलेले पैसे दिले कोरोनाग्रस्तांना

बीड | बीडच्या वडवणीमध्ये मयूर आंधळे यांचा साखरपुडा होता. पण कोरोनाच्या वाढत्या दहशतीमुळे सरकारने गर्दीचे कार्यक्रम तसेच लग्न समारंभ पुढे ढकलण्यास सांगितले आहे. त्यामुळे आंधळे कुटुंबियांनी साखरपुड्यातच लग्न उरकून घेतलंय.

मयूर आंधळे यांनी लग्न केल्यानंतर कोरोना व्हायरसची जनजागृतीही केली. तसेच आपत्ती व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाख रुपयांची मदतही जाहीर केली.

लग्न समारंभात पाहुण्यांची होणारी वर्दळ लक्षात घेऊन त्यांनी हे लग्न केलं. जिल्हाधिकारी राहुल रेखावार त्यांच्याकडे ते एक लाखांचा धनादेश सुपूर्द करणार आहेत.

वाशिममध्येही कोरोनाच्या भीतीने साखरपुड्यातच लग्न उरकण्यात आले. वाशिम जिल्ह्यातील वर आणि यवतमाळ जिल्ह्यातील वधू यांचा 8 मार्च रोजी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे साखरपुडा होता.

ट्रेंडिंग बातम्या-

कोरोनाबद्दल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची पत्रकार परिषद, वाचा सर्व मुद्दे एकाच ठिकाणी

पुण्यात जमावबंदी लागू करण्याचा विचार- डॉ. दीपक म्हैसेकर

महत्वाच्या बातम्या-

मास्क, सॅनिटायजरचा काळा बाजार केल्यास कारवाई करणार- छगन भुजबळ

…तर कोरोनाबाधित रुग्णांना नजरकैदेत ठेवणार- राजेश टोपे

कोरोनाविषयीची माहिती फक्त एका फोनवर; केंद्राकडून हेल्पलाईन नंबर जारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More