बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चिंता वाढली! महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट; काल दिवसभरात आढळले इतके रूग्ण

मुंबई | राज्यात कोरोना संसर्गाचा आता उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्यासंख्येने कोरोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्यात पुन्हा एकदा विकेंड लाॅकडाऊन घोषित करण्यात आला आहे. प्रशासनाकडून निर्बंध अधिक कडक करण्यात येऊन देखील, रूग्ण संख्येतील वाढ सुरूच आहे, म्हणुन हा निर्णय घेण्यात आला आहे. काल यासंबंधीची नियमावली सरकारतर्फे जारी करण्यात आली. काल दिवसभरातील कोरोनाबाधितांची आकडेवारी ही अत्यंत धक्कादायक आहे.

दिवसभरात राज्यात तब्बल 57 हजार 074 कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून, 222 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर झपाट्याने वाढत असल्याचं दिसून येत आहे. राज्यात आतापर्यंत 55 हजार 878 रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. त्याचबरोबर राज्यात सध्या एकूण 4 लाख 30 हजार 503 सक्रिय रूग्णसंख्या आहे.

महाराष्ट्र सरकारने विचार करून बैठका घेऊन कोरोना रोखण्यासाठी कठोर पावले उचलत अखेर राज्यात विकेंड लाॅकडाऊन घोषित केला, पण आतातरी लोक नियमांचं पालन करून सरकारला सहकार्य करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

संपुर्ण महाराष्ट्रासह पुण्यातही कोरोनानं मोठ्या प्रमाणात थैमान घातलं असल्याचं दिसून येत आहे. काल दिवसभरात पुण्यात 6 हजार 225 कोरोनाबाधितांची विक्रमी नोंद झाल्याचं प्रशासनाकडुन स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे सर्वांच्या चिंतेत भर पडली आहे. तसेच कोरोनामुळे नागरिकांमध्ये भितीचं वातावरण पसरलं आहे.

थोडक्यात बातम्या

कामगाराला कोरोना झाल्यास…; ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत राज्य सरकारचा ‘हा’ नवा नियम

महाराष्ट्राच्या लॉकडाऊनबद्दल अजित पवारांचं मोठं वक्तव्य

गर्लफ्रेंडनं आपल्याच बॉयफ्रेंडचा प्रायव्हेट पार्ट कापला अन्… अत्यंत धक्कादायक घटनेनं खळबळ

पुण्यात कोरोनाचा उद्रेक, दिवसभरात इतक्या रुग्णांची नोंद

“टीव्ही चॅनलवाल्यांनी पश्चिम बंगाल तामिळनाडूतील गर्दीचे शॉट महाराष्ट्रात दाखवत बसू नये”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More