बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कोरोनाने आपल्या पालकांना गमावलेल्या मुलांना मोफत शिक्षण द्या”

मुंबई | कोरोनाने देशभरात हैदोस घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाची आकडेवारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एकीकडे कोरोना तांडव घालत असताना ऑक्सिजन तुटवडा, रूग्णांना बेड उपलब्ध नाही आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार चालू आहे. ऑक्सिजनअभावी अनेकजणांनी आपला प्राण गमावला. या महामारीमध्ये अनेक कुटुंबच्या कुुटुंब रस्त्यावर आलीत. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध अभिनेता सोनू सूदने सरकारला एक मागणी केली आहे.

मी सरकारला विनंती करतो केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा कोणतीही संस्था जे मदत करतंय त्यांनी एक नियम तयार करायला हवा. करोना काळात ज्या मुलांनी त्यांच्या पालकांना कमागवले त्या मुलांचे संपूर्ण शिक्षण, शाळेपासून ते कॉलेजपर्यंत, मग तो मुलगा सरकारी शाळेत शिक्षण घेत असो किंवा खासगी शाळेत त्यांचे शिक्षण हे मोफत व्हायला हवं, अशी मागणी सोनूने केली आहे. यासंदर्भात प्रियंकाने एक व्हिडीओ शेअर केला आहे.

ज्या मुलांनी कोरोनामुळे आपल्या पालकांना गमावले अशा मुलांचं भविष्य सुरक्षित राहिल. तसेच ज्या कुटुंबीयांनी घरातील कमावती व्यक्ती गमावली आहे अशा लोकांसाठी पण एक नियम तयार करायला हवे जेणे करुन त्यांना त्यांचे आयुष्य जगता येईल, असं सोनू सूदने म्हटलं आहे.

दरम्यान,  अनेक लोकांनी त्यांच्या कुटुंबातील महत्त्वाच्या व्यक्तींना गमावलेे. अनेक मुलांनी त्यांच्या पालकांना गमावले. कोणी दोन दिवसांपूर्वी आईला गमावले तर दोन दिवसांनंतर वडिलांना. अनेक मुलांच्या आई-वडील दोघांचेही निधन झाले. ही मुलं खूप लहान आहेत. या मुलांपैकी कोणी दहा वर्षांचे तर कोणी आठ वर्षांचे आहे. मी नेहमी विचार करतो या मुलांच्या भविष्याचे काय होणार? हे खूप महत्त्वाचे आहे, असंही सोनू म्हणाला.

 

Shree

थोडक्यात बातम्या- 

…म्हणून परमबीर सिंह यांनी माझ्यावर आरोप केले- अनिल देशमुख

कोल्हापुरात पावसाचा कहर, आश्चर्यकारक घटना कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ

पुण्यात नव्या रूग्णांपेक्षा डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त! वाचा आजची आकडेवारी..

माणुसकीला काळीमा फासणारी घटना! सलग 5 तास कोरोनाबाधीताचा मृतदेह रूग्णालयाबाहेर होता पडून

सीटी स्कॅनमुळे कॅन्सर होण्याचाही धोका संभवतो मग सीटीस्कॅन करावं की नाही?, तात्याराव लहाने म्हणाले….

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More