बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशातील कोरोना रूग्णसंख्या वाढली; पण सक्रिय बाधितांची संख्या मात्र नियंत्रणात?

नवी दिल्ली |  संपुर्ण जगात गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाने थैमान घातल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यात आता देशातील कोरोना रूग्णसंख्येत मात्र चढउतार सुरूच असल्याचं दिसून येत आहे. मागच्या 7 महिन्यातील सर्वात कमी रुग्णसंख्येची नोंद सोमवारी करण्यात आली पण आता ही रूग्णसंख्या हळूहळू वाढत असल्याचं दिसून येत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

मागच्या काही महिन्यांंमध्ये वाढणारी रुग्णसंख्या आता आटोक्यात आली आहे. काल देशात 22 हजार 431 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसात हळुहळु कमी कोरोना रुग्णांची नोंद होत असल्याचं दिसून येत आहे. त्याचबरोबर काल 24 हजार 602 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून आपल्या घरी परतले आहेत.

भारतातील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना आता हळूहळू कोरोना आटोक्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. काल देशभरात 318 कोरोनाबाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत देशभरात 04 लाख 49 हजार 856 जणांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे.

देशभरात सध्या 02 लाख 44 हजार 198 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. भारतात लसीकरण मोहीमही मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे. त्यात आता तिसऱ्या लाटेचा धोका व्यक्त केला जात असल्याने अजून चिंतेत भर पडली आहे. आतापर्यंत भारतात 92 कोटी 63 लाख 68 हजार 608 नागरिकांचं कोरोना लसीकरण पूर्ण झालं आहे.

थोडक्यात बातम्या –

राज्यभरातील मंदिराचे दरवाजे उघडले पण ‘या’ 6 मंदिरासाठी मात्र कलम 144 लागू

“जेव्हा बार उघडले तेव्हा…; भवानी आणि मुंबादेवीला काय उत्तर देणार ठाकरे सरकार?”

शेवटी आईच ती! आर्यनला कोठडीत घेऊन गेली बर्गर

बापरे! सर्वसामान्यांचा ताण वाढला, गॅस आणि पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा गगनाला भिडले

अखेर मंदिरांची दारं उघडली; असा करता येणार मंदिरात प्रवेश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More