बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाचा संसर्ग वाढला, महाराष्ट्र नंतर ‘या’ राज्याने लागू केले कठोर निर्बंध

चंदीगड | गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नंतर देशातील अन्य राज्यांमध्येही कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या वेगाने होत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आज अधिक कठोर निर्बंध लागू केले आहेत. आता महाराष्ट्र नंतर अजून एका राज्यामध्ये कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने सरकार अलर्ट झाले असून, मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

वाढत्या कोरोनामुळे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी कोरोनाला रोखण्यासाठी या निर्णयांची घोषणा केली आहे. पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी कोरोनामुळे प्रभावित असलेल्या 11 जिल्ह्यांत सर्व सामाजिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. सोबतच सर्व शिक्षण संस्था बंद करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. यामधून वैद्यकीय आणि नर्सिंग महाविद्यालयांना सूट देण्यात आली आहे. हे निर्बंध 21 मार्चपासून सुरू होऊन 31 मार्चपर्यंत लागू राहणार आहेत.

पंजाबमधील लुधियाना, जालंधर, पटियाला, मोहाली, अमृतसर, होशियारपूर, कपूरथला, शहीद भगतसिंगनगर, फत्तेहगड साहिब, रोपड आणि मोगा या जिल्ह्यात हे निर्बंध लागू राहणार आहेत. त्याबरोबरच या जिल्ह्यांमध्ये रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहील. राज्यामध्ये चित्रपटगृहे 50 टक्के क्षमतेने चालवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर मॉलमध्ये एकावेळी 100 हून अधिक जणांना गोळा होण्यास परवानगी नसेल.

दरम्यान, महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे नियम आणखी कडक करण्यात आले आहेत. राज्य शासनाने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ‘मिशन बिगीन’ अंतर्गत राज्यातील सर्व खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये फक्त 50 टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती ठेवण्याबाबत आदेश जारी केले आहेत.

थोडक्यात बातम्या – 

‘मी नरेंद्र मोदी नसून फसवणार नाही, मी तुम्हाला…’; राहुल गांधींनी दिली ही पाच आश्वासनं

राज्यपालांकडे तक्रार केल्यानंतर पंकजा मुंडेनी घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय

कोरोनावरील लसीचा ‘DNA’ वर परिणाम होतो का? आरोग्यमंत्री म्हणाले…

आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं तोंडही पाहायचं नाही- ममता बॅनर्जी

महाराष्ट्र सरकारकडुन कोरोनासंदर्भात नव्या गाईडलाईन्स जारी; ‘हे’ आहेत नवे नियम!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More