बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कोरोना ‘ना स्त्री, ना पुरूष’ अशा मनोवृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे”

मुंबई | कोरोना माहामारीचा फटका संपूर्ण जगाला बसला आहे. देशात आणि राज्यात कोरोनामुळं अनेकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना आल्यापासून कोरोनाबाबत अनेक तर्कवितर्क लावण्यात आले. मात्र आता लसीकरणामुळे मृत्यूदर कमी होताना दिसत आहे. अशातच आता शिवप्रतिष्ठानचे भिडे गुरूजी यांनी कोरोनाबाबत एक अजब वक्तव्य केलं आहे.

कोरोना हा काल्पनिक असून तो ना स्त्री, ना पुरूष अशा मनोवृत्तीच्या माणसांना होतो, असं अजब वक्तव्य भिडे यांनी केलं आहे. परिणामी कोरोनाचा संबंध आता थेट माणसांच्या स्त्री आणि पुरूष नसलेल्यांशी लावल्यानं सर्वत्र भिडे यांची चर्चा आहे. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर भिडे गुरूजींच्या या वक्तव्यानं सर्व क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत.

भिडे यांनी याआधी सुद्धा अनेक अजब-गजब वक्तव्य केली आहेत. दीर्घ काळ परक्यांचा मार खात, दास्यत्व स्विकारत, खरकटं उष्टं खात, त्यामुळे निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान आहे, असं संभाजी भिडे यांनी याआधी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर अनेकांनी टीका देखील केली होती.

दरम्यान, संभाजी भिडे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे देखील राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. मात्र त्यांनी यावेळी थेट देशातील लोकांना निर्लज्ज म्हटलं होतं. त्यामुळे त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे वाद पेटण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या 

‘त्यांनी आपलं मंत्रिपद भाड्यानं दिलंय’; पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना अप्रत्यक्ष टोला

“गोपीनाथ मुंडेंनी माझ्या कानात सांगितलं होतं, हा महादेव जानकर मेला तरी…”

“मी भाजपला सांगते, आता तारखा देणं बंद करा”

“ज्यांनी परप्रांतियांच्या कानाखाली मारली त्यांनी ‘गर्व से कहो हम हिंदू है’ म्हणू नये”

“महाराष्ट्रात फक्त बाळासाहेब ठाकरे वाघ होते, तुमच्यासारख्यांना ती उपमा देता येणार नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More