मुंबई | मुंबई लष्कराच्या ताब्यात देणार अशी एक अफवा पसरली आहे. लष्कर कशाला पाहिजे? आत्तापर्यंत जे काही केलं ते तुम्हाला सांगून करणार आणि तसंच करणार आहे. असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे स्पष्ट केलं.
महाराष्ट्रातले सगळे नागरिक हे सैनिकांसारखेच आहेत. कोरोनाचं संकट गंभीर असलं तरीही सरकार खंबीर आहे हे विसरु नका असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
काल एक चांगली गोष्ट झाली, महाराष्ट्राच्या सर्वपक्षीय बैठक झाली. सगळ्यांना काय करतो आहोत त्याची कल्पना दिली गेली. त्यांच्याकडून सूचना घेण्यात आल्या. मला एका गोष्टीबद्दल समाधान आहे की सगळ्यांनी खूप चांगल्या सूचना दिल्या. काल जी बैठक झाली ते एकजुटीचं वेगळं दर्शन होतं, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
महाराष्ट्रातले सगळे नेते राजकारण बाजूला ठेवून एकवटले. त्यामुळे माझा आत्मविश्वास आणखी दुणावला असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
“नमस्ते ट्रम्प कार्यक्रमामुळेच गुजरातमध्ये कोरोना पसरला”
खडसे आणि पंकजा मुंडे स्वतःच स्वतःला समजावून सांगतील- चंद्रकांत पाटील
महत्वाच्या बातम्या-
मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची तडकाफडकी बदली!
“दादांनी प्राॅमिस मोडलं”, मेधा कुलकर्णींच्या डोळ्यात आलं पाणी
‘यंदा फीवाढ करु नका’; मंत्री वर्षा गायकवाड यांचे शिक्षण संस्थांना आदेश
Comments are closed.