बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सावधान!!! महाराष्ट्रात कोरोनाचा हाहाकार; आज तब्बल एवढ्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे आज टास्क फोर्सची बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनसारखे कडक निर्बंध राज्यात लागू करावेत असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. महाराष्ट्र हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असताना आजची महाराष्ट्राची कोरोनाबाधितांची संख्या ही धक्कादायक आहे.

महाराष्ट्रात आज दिवसभरात 40 हजार 414 एवढ्या विक्रमी कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून वाढता रुग्णसंख्येचा आकडा हा पुन्हा एकदा चिंतेचा विषय बनत चालला आहे. महाराष्ट्रात आता लॉकडाऊन सदृश्य परिस्थिती झाल्याचं दिसून येत आहे. त्यातच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्रात ‘आयसीएमआर’च्या नियमावलीनुसार कोरोनाची साखळी तोडायची असल्यास 15 दिवसांचा कडक लॉकडाऊन गरजेचा असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं.

आज महाराष्ट्रात एकूण 3 लाख 25 हजार 901 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत एकूण 23 लाख 32 हजार 453 रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी गेले आहेत. आज एका दिवसात 17 हजार 874 एवढे कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले.

सध्या महाराष्ट्रातील पुणे शहराची परिस्थिती गंभीर असल्याचं दिसून येत आहे. कारण आज एकाच दिवसात तब्बल 4 हजार 426 हा चिंतेत भर घालणारा कोरोनाबाधितांचा आकडा पुण्यातून पुढे आला आहे. महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 85.95 टक्के आहे, पण रुग्णवाढीचंही प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यानं प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. त्यामुळे आता पुन्हा महाराष्ट्र लाॅकडाऊनमध्ये जाणार का? हा प्रश्न सध्या सर्वसामान्य जनमानसाला भेडसावत आहे.

थोडक्यात बातम्या –

शेवटच्या षटकापर्यंत रंगला थरारक सामना, असा झाला भारताचा विजय!

ठोकर खाके आदमी ठाकूर बनता है!; मराठमोळ्या शार्दुलचं विरुकडून कौतुक

महाराष्ट्रात 15 दिवसांचा लाॅकडाऊन लागणार?; आरोग्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

पैसे खात नाही असा अधिकारी-कर्मचारी पोलीस दलात नाही- निवृत्त IPS मीरा बोरवणकर

पुण्यातील कोरोना रुग्णांची वाढ काही थांबेना, आजही आकडेवारी धडकी भरवणारी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More