बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कोरोना हा आजार नाही, अल्लाहसमोर रडत माफी मागितल्यास तो नष्ट होईल”

नवी दिल्ली | कोरोनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या काळात अनेकांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावलं आहे. मात्र या संकटाच्या काळात अनेक नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत. आता सपा खासदार शफीकुर्रहमान बर्क यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

कोरोना हा काही आजार नाही. कोरोना जर आजार असता तर जगात त्यावर काहीती उपाय असता. कोरोनाचे संकट हे सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळे आलेलं संकट आहे. अल्लाह समोर रडून माफी मागितल्यास हे संकट नष्ट होईल, असं शफीकुर्रहमान बर्क यांनी म्हटलं आहे.

सध्याच्या सरकारने शरीयतमध्ये छेडछाड करण्याबरोबरच आपल्या कार्यकाळामध्ये मुलींना पकडून देत त्यांच्या बलात्कार करणे, मॉब लिचिंग आणि इतरही अनेक गुन्हे सरकारने केलेत ज्यामुळे कोरोनासारखं मोठं संकट देशात आलं आहे, असंही शफीकुर्रहमान बर्क यांनी म्हटलंय.

मी गेल्याच वर्षी कोरोना हा काही आजार नसल्याचं म्हटलं होतं. आजार असता तर त्यावर उपाय असता, पण असं कोरोनासंदर्भात नाहीय. अल्लाहसमोर रडत रडत आपल्या चुकींसाठी माफी मागणं हा कोरोनावर मात करण्याचा त्याला नष्ट करण्याचा एकच मार्ग आहे, असं शफीकुर्रहमान बर्क यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

महिला म्हणाली, “शाहरुखला भेटूनही इतका आनंद झाला नाही!; मोदींचं स्मितहास्य…

35 वर्षाय महिलेकडून 16 वर्षाच्या मुलावर… अत्यंत धक्कादायक माहिती आली समोर

चालतं-फिरतं जिवंत मॅगनेट; व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

“तुमचे मंत्री काका-पुतण्यापुढे लाचार, मी सोनिया गांधींकडे तक्रार करणार”

छत्रपती घराण्याचं काम लोकांना पेटवण्याचं नाही, तर न्याय देण्याचं- खासदार संभाजीराजे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More