नवी दिल्ली | कोरोना (Corona Virus) संपला असं वाटत असतानाच कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने अनेक देशात पुन्हा डोकं वर काढायला सुरूवात केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचं दिलासादायक चित्र दिसत असताना कोरोनाचा BA.2 व्हेरिएंट धोकादायक ठरू शकतो, असं मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
अमेरिकेतील संसर्गजन्य रोग तज्ज्ञ व व्हाईट हाऊसचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फाऊची यांनी कोरोना संपला नसून तो आणखी वाढणार असल्याची भीती व्यक्त केली आहे. BA.2 व्हेरिएंट हा ओमिक्रॉनचा (Omicron) एक संसर्गजन्य उपप्रकार आहे. तर फाऊची यांनी कोरोनाच्या BA.2 व्हेरिएंट व्हेरिएंटबद्दल देखील भीती व्यक्त केली.
अमेरिकेत नव्याने नोंदवल्या गेलेल्या प्रकरणांपैकी सुमारे 30 टक्के प्रकरणं ही BA.2 प्रकाराची आहेत. हा प्रकार ओमिक्रॉनपेक्षा 60 टक्के संसर्गजन्य असल्याचं डॉ फाऊची म्हणाले. तर BA.2 अधिक संसर्गजन्य असला तरी तो गंभीर दिसत नसल्याचं देखील डॉ फाऊची यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, या व्हेरिएंटमुळे अमेरिकेत कोरोना व्हायरसच्या केसेसमध्ये वाढ होऊ शकते, असा इशारा देखील डॉ. फाऊची यांनी दिला. तर BA.2 व्हेरिएंटमुळे प्रकृती गंभीर होऊ नये यासाठी लसीकरण आणि बुस्टर डोस गरजेचे असल्याचं फाऊची यांनी सांगितलं आहे. अनेक देशात कोरोनाची वाढती प्रकरणं बघता भारतातही चिंता व्यक्त केली जात आहे.
थोडक्यात बातम्या-
मोठी बातमी! पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ, जाणून घ्या आजचे ताजे दर
“वहिनीसाहेबांचा आग्रह असेल तर तो आग्रह आम्ही पाळू”
“उरलेले दोन तास सुद्धा मोदींना झोपू द्यायचं हे नाही त्यांनी ठरवलंय”
जो बायडन यांच्या वक्तव्यावर रशियाची नाराजी, उचललं ‘हे’ मोठं पाऊल
धक्कादायक! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा रस्ते अपघातात मृत्यू
Comments are closed.