बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तेव्हा तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का?- रोहिणी खडसे

जळगाव | सध्या कोरानोचा प्रादुर्भाव वाढत असताना रेमडेसिवीर या इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. यावरून राजकीय वातावरणही तापलं आहे. केंद्र सरकारने यापूर्वीच निर्यातबंदी केली असती तर रेमडेसिविरचा तुटवडा भासला नसता. मात्र, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे नागरिकांची धावपळ होत असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केली होती. त्यानंतर भाजपचे आमदार राम सातपुते यांनीही खडसेंवर खोचक टीका करत भ्रष्टाचाराचे आरोप केेले होते. यावरून नाथाभाऊंच्या कन्या रोहिणी खडसे आक्रमक झाल्या असून त्यांनी संतप्त असा सवाल केला आहे.

नाथाभाऊ आपण आयुष्यभर पैसे खायचे सोडून दुसरं काहीच केलं नाही आणि देवेंद्र फडणवीसांबद्दल बोलत आहात. विरोधी पक्षनेता असताना तोडपाणी आणि मंत्री झाले तेव्हा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप आमदार राम सातपुते यांनी केला. तसेच निष्कलंक देवेंद्र फडणवीसांवर बोलण्या अगोदर आरसा बघा सगळं लक्षात येईल, असं राम सातपुते यांनी म्हटलं होतं. यावर रोहिणी खडसेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ खडसे जर पैसे खात होते तर मग सत्ता होती तेव्हा कारवाई का केली नाही?, तेव्हा काय तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का?, असा सवाल रोहिणी खडसे यांनी केला आहे. तसेच तुमच्यात हिंमत असेल तर सिद्ध करा ना? शामराव फडणवीसी मिरची तुम्हाला का झोँबली? ज्यांच्याबद्दल बोलले त्यांच्या तोंडात काय मिठाची गुळणी आहे का?, असं रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, रोहिणी खडसेंच्या या सवालाला राम सातपुतेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. ताई मंत्रीपद गेलं ना हो नाथाभाऊंच या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळं तीच कारवाई झाली ना तेव्हा आणि यामुळेच आपला 2019 ला मुक्ताईनगर च्या जनतेने पराभव केला. कशाला बोलायला लावता ताई?, असं राम सातपुतेंनी उत्तर दिलं.

 

थोडक्यात बातम्या- 

“लवकरच तुमचा माज उतरवला जाणार”; भाजप आमदाराचा शिवसेनेला इशारा

घरात झोपला होता व्यक्ती, आरोपीनं डोकंच कापून स्वतःसोबत नेलं!

खासदार सुजय विखेंनी दिल्लीहून आणली 300 रेमडेसिवीर, नगरमध्ये मोफत वाटप

एसी दुरुस्त करण्यासाठी आलेल्या दोघांसोबत भयानक प्रकार, गुप्तांगावर पेट्रोल टाकून…

“विरोधी पक्षनेत्याला मुख्यमंत्र्यांसारखेच अधिकार असतात”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More