बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उसतोड कामगाराच्या डॉक्टर मुलाचा कोरोनाने मृत्यू!

परभणी | परभणीच्या पाथरी येथील आनंद नगर तांड्यावर राहणारा डॉक्टर राहुल पवार याचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यानं आज सकाळी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला आहे.

कोरोना विषाणूची लागण झाली होती. तसेच त्याला कोरोनासोबतचं म्युकरमायकोसिसचा संसर्गही झाला होता. मागील एक महिन्याहून अधिक कालावधीपासून तो औरंगाबाद येथील एमजीएम रुग्णालयात उपचार घेत होता.

परभणीच्या पाथरी तालुक्यातील आनंदनगर तांडा येथील रहिवासी असणारा राहुल विश्वनाथ पवार लातूर येथील एमआयटी कॉलेजमधून एमबीबीएसचं शिक्षण घेतं होता. एप्रिल महिन्यात राहुलची एमबीबीएस पदवीची शेवटच्या वर्षाची परीक्षा झाली. यावेळीच त्याला कोरोनाची लक्षणं जाणवतं होती. पण परीक्षा नाही दिली, तर सहा महिने वाया जातीलं. या भीतीनं राहुलने आजारी असूनही परीक्षा दिली.

घरची परिस्थिती बिकट असल्यानं त्याच्या उपचारासाठी मित्रांनी आणि महाविद्यालयाने निधीही उपलब्ध करून दिला होता. पण त्याची कोरोनाशी लढाई अपयशी ठरली आहे. त्यानं आज उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला आहे. घरातील गरीब परिस्थितीपुढे कधीही हात न टेकलेल्या राहुलचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

थोडक्यात बातम्या- 

“खोकला, शिंकणे किंवा बोलल्यानं कोरोना हवेत पसरतो अन्…”

धक्कादायक! कर्मचारी ऑक्सिजन सपोर्टवर असतानाही जबरदस्तीनं बोलवलं कामावर अन्…., पाहा व्हिडीओ

देसी जुगाड! वाफ घेण्यासाठी तरुणानं लढवली अनोखी शक्कल, पाहा व्हिडीओ

महाराष्ट्रातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 3.15 लाखांवर, पाहा आकडेवारी एका क्लिकवर

धक्कादायक! लाॅकडाऊनचा नियम मोडल्यानं पोलिसांनी मुलाच्या हाता-पायावर ठोकले खिळे?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More