बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी एका क्लिकवर

नवी दिल्ली | देशातील कोरोनाबाधितांची (India Corona) संख्या गेल्या काही महिन्यात सतत वाढत असताना आता हळूहळू ही रुग्णसंख्या आटोक्यात आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तसेच कोरोनाबाधितांच्या संख्येतही दिवसेंदिवस मोठ्या घट होत आहे. त्यामुळे दिलासादायक वातावरण पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासातील देशातील कोरोनाबाधितांची (Corona Update) आकडेवारी ही काही प्रमाणात चिंता वाढवणारी आहे.

गेल्या 24 तासात देशभरात 08 हजार 309 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या आता आटोक्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तसेच आता नव्या ओमिक्राॅन व्हेरिएंटमुळे चिंता आणखी वाढली आहे.

दरम्यान, सध्या देशभरात 1 लाख 03 हजार 859 सक्रिय कोरोनाबाधित (Active Corona Patient) रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर मागच्या 24 तासात 236 कोरोनाबाधित रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे अनेकांना जीव गमवावा लागल्याने अनेक कुटूंब उध्वस्त झाले आहेत.

देशभरात लसीकरण मोहीम (Vaccination Drive) मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत असून भारताने 100 कोटींचा विक्रमी टप्पा पार केला. तसेच सर्व नागरिकांनी लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदवत लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करून घ्यावं, असे आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे करण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या

विराटच्या रोमँटीक पोस्टवर अनुष्काचं मजेशीर उत्तर, म्हणाली…

ओमिक्राॅनची धास्ती! आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्बंधाबाबत निर्णय होणार?

एसटीनंतर आता टॅक्सी ड्रायव्हर्सचाही संपाचा इशारा, केली ‘ही’ महत्त्वाची मागणी

‘महाराष्ट्र वसूली संस्कार’; अमृता फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

“दोन वर्षात न चुकता भ्रष्टाचार करण्याचं काम महाविकास आघाडीने केलं आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More