बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनामुळे मराठी गझलकाराला 90 वर्षांच्या आईसोबत रस्त्यावर राहण्याची वेळ!

पालघर | गझलकार मदन काजळे यांच्यावर या कोरोनाकाळात 90 वर्षाच्या आईसह रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे. विदर्भातून आलेले मदनजी मराठी भाषिक असूनही उत्कृष्ट उर्दू गजल गातात. मात्र त्यांना लॉकडाऊननं रस्त्यावर आणलं आहे.

कामधंदा नाही, पैसा नाही, घरभाडे भरता येत नाही म्हणून आपल्या 90 वर्षांच्या आईला घेऊन वसईच्या रस्त्यावर येण्याची नामुष्की या गझलकारावर आली. या गझलकाराला सध्या बहुजन विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी वसई विरार महापालिकेच्या निवारा केंद्रात आश्रय दिला आहे.

संगीताच्या क्लासला कोणी येत नाही त्यामुळे घराचे भाडे देऊ शकले नाही. त्यामुळे 90 वर्षांच्या आईसोबत 15 दिवसांपासून गझलकाराला रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे.

सुरेश वाडकर, देवकी पंडित यांच्यासोबत देखील काम केलं आहे. तसेच त्यांनी जीवनगौरव पुरस्कार सन्मानित श्रीकृष्ण राऊत यांच्या रचना देखील गायल्या आहेत. 2010 साली त्यांना सुरेश भट स्मृती पुरस्कार मिळाला. मेहंदी हसन, मन्ना डे, मोहम्मद रफी, किशोर कुमार, उदित नारायण, रुपकुमार राठोड यांच्यासह अनेक गीतकारांची गाणी ते आपल्या आवाजात सादर करतात.

थोडक्यात बातम्या- 

हृदयद्रावक! 10 वर्षांनी पहिलं मूल झालं, 6 महिन्यांतच चिमुकलीला कोरोनानं गाठलं अन्…

‘…हा तर अजित पवारांचा दांभिकपणा’; चंद्रकांत पाटील आक्रमक

संकटाच्या काळात मयताच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या काही औलादी आहेत- अजित पवार

पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधानांना देण्यात आलेली वागणूक योग्य नाही- राजनाथ सिंग

मोदींना ममता बॅनर्जींनी अर्धा तास वाट पाहायला लावली; नुकसानीचा अहवाल दिला अन्…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More