Top News महाराष्ट्र मुंबई

“नागरिकांनो घाबरू नका, आतापर्यंत 1282 कोरोनाबाधित ठणठणीत बरे झालेत!”

मुंबई |  महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा हा चिंतेचा विषय असला तरी मृत्यूदर रोखण्यात आता महाराष्ट्र शासनाला आणि प्रशासनला यश आले आहे. त्याचाच परिपाक म्हणजे आतापर्यंत 1282 कोरोनाबाधित ठणठणीत बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यात आज 522 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 8590 अशी झाली आहे. यापैकी 1282 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत, असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

सोमवारी 94 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 1282 रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण 6939 कोरोनाबाधित रुग्णांवर इस्पितळात उपचार सुरु आहे, असं टोपे यांनी सांगितलं आहे.

सोमवारपर्यंत पाठविण्यात आलेल्या 1 लाख 21 हजार 562 नमुन्यांपैकी 1 लाख 12 हजार 52 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत तर 8590 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 45 हजार 677 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 9 हजार 399 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

“दात कोरून देश चालवायचा असेल तर अर्थमंत्र्यांची गरज काय?”

“यापुढे राज्य सरकारांना सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय सेवा आणि शिक्षणावर सर्वाधिक खर्च करावा लागेल”

महत्वाच्या बातम्या-

राजस्थानमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी 100 एसटी बस पाठवणार- परिवहन मंत्री

महाराष्ट्र हा देशाचा आर्थिक कणा; हा कणा मोडू नका हेच पवारांनी केंद्राला सांगितलंय- संजय राऊत

शेतकऱ्यांच्या बांधावर बी-बियाणे आणि खतं पोहचवा; कृषीमंत्र्यांचे आदेश

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या