बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होतीये, आरोग्यमंत्र्यांचा महत्त्वाचा खुलासा

मुंबई |  महाराष्ट्रात नव्याने नोंद होणारी कोरोनाबाधितांची रूग्णसंख्या ही शासन आणि प्रशासनाच्या दृष्टीने चिंतेचा विषय ठरली आहे. शासन पातळीवर त्यासंबंधी विविध उपाययोजना सुरू आहेत. नव्याने नोंद होणाऱ्या रूग्णसंखेवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपलं मत व्यक्त केलं.

तब्बल दोन-अडीज महिन्यांच्या लॉकडाऊननंतर आता अनलॉकिंगलच्या प्रोसेसला सुरूवात झाली आहे. ही सुरूवात झाल्यानंतर शासनाकडून विविध नियम आणि अटी पाळण्यासंबंधी सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र नागरिक त्याकडे साफ दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. तसं की मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे… हे नियम न पाळण्यानेच आणि पुरेशी काळजी न घेतल्यानेच रूग्णसंख्येत वाढ होत आहे, असं आरोग्यमंत्री म्हणाले.

सरकारने घालून दिलेले नियम आणखी काही दिवस पाळायला हवेत. आता जास्त दिवस लॉकडाऊन पवडणारा नाहीये. आता ते राज्याच्या हिताच्या दृष्टीने योग्य नाहीये. नागरिकांनीच यासंबंधीची काळजी घ्यायला हवी, असं ते म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज राज्यातील सर्व महापालिका आयुक्त, विभागीय आयुक्त तसंच जिल्हाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत विविध शहरांतली कोरोना परिस्थितीवर चर्चा करण्यात आली.

ट्रेंडिंग बातम्या-

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या खांद्यावर देण्यात आली ‘ही’ नवी जबाबदारी

कोव्हिड-19 चाचण्यांची क्षमता वाढवण्यासाठी ससून रुग्णालयाला 12 कोटी 44 लाखांचा निधी मंजूर- अजित पवार

महत्वाच्या बातम्या-

अंदमान-निकोबार बेटांवर विशेष लक्ष द्या, नौदलाला सतर्कतेचा इशारा

…म्हणून नाशिक प्रशासनाने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना दिला घरीच थांबण्याचा सल्ला

आता ‘या’ देशात अनोळखी माणसासोबत शरीरसंबंध ठेवता येणार नाहीत, कारण…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More