मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच असून परिस्थिती आटोक्यात येण्याची चिन्हं दिसून येत नाही. त्यातच भर म्हणून महाराष्ट्रात आज दिवसभरात 31 हजार 643 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 102 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणा अधिक सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे.
कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यात कडक निर्बंध लागू करणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. एकुण 20 हजार 854 रुग्ण आज कोरोनामुक्त झाले असून आज पर्यंत बरे होणाऱ्यांची संख्या 21 लाख 54 हजार 253 एवढी झाली आहे.
एकीकडे रुग्णसंख्या वाढत असतानाच दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही 85.71 टक्के झाल्याचं दिसुन येत आहे. महाराष्ट्रात सध्या एकूण 3 लाख 36 हजार 584 सक्रिय रुग्ण आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ आरोग्यमंत्र्यांनीही राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेत दिल्याने आता तरी लोक नियमांचं पालन करून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये अंशतः लाॅकडाऊन करण्यात आलेला आहे. तसेच, काही ठिकाणी रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. परंतु, तरीही कोरोना आटोक्यात येत नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
थोडक्यात बातम्या –
मनाला सुन्न करणारा व्हिडीओ! बलात्कार पीडितेला आरोपीसोबत बांधून काढली धिंड, मातोंडकरही भडकल्या
महाराष्ट्रातील आणखी एका जिल्ह्यात 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन, पेट्रोलपंप, हॉटेलसाठी नवीन नियमावली
राष्ट्रवादी काँग्रेसचा ठाकरे सरकारच्या लाॅकडाऊनला विरोध
कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूीवर पुण्याच्या महापौरांनी घेतला हा महत्त्वाचा निर्णय
पुण्यासाठी आजचा दिवस जरा बरा, एवढ्या कोरोना रुग्णांची नोंद
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.