Top News आरोग्य कोरोना विदेश

न्यूझीलंडमध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव, 3 दिवसात पुन्हा ‘इतक्या’ रुग्णांची नोंद

न्यूझीलंड | न्यूझीलंडने चांगली कामगिरी करत कोरोनावर नियंत्रण मिळवलं होतं. देश कोरोनामुक्त झाल्याचंही न्यूझीलंडच्या पंतप्रधानांकडून सांगण्यात आलं होतं. मात्र कोरोनामुक्तीच्या 102 दिवसांनंतर न्यूझीलंडमध्ये पुन्हा कोरोनाने शिरकाव केला. ऑकलंडमध्ये चार जणांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं होतं. तर आता तीन दिवसांतच पुन्हा 30 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत.

देशात पुन्हा एकदा कोरोनाचे रूग्ण आढळून आल्याने सरकारपुढे पुन्हा एकदा कोरोनामुक्तीचं आव्हान पुढे येऊन ठेपलंय. शुक्रवारी पुन्हा एकदा न्यूझीलंडमध्ये 12 नवीन कोरोनारूग्णांची भर पडलीये. त्यामुळे आता देशात कोरोनाबाधितांची संख्या 48 वर जाऊन पोहोचली आहे. रूग्णांची संख्या पाहता ऑकलंडमध्ये 12 दिवसांचा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.

आरोग्य विभागाच्या महासंचालक अॅश्ली ब्लूमफिल्ड यांच्या सांगण्यानुसार, ऑकलंडसोबतच वाईकाटो याठिकाणीही कोरोनाच्या एका संशयित व्यक्तीची नोंद करण्यात आली आहे. सध्या या व्यक्तीला रूग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. ऑकलंडमध्ये असलेल्या कोरोनाबाधित व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. कदाचित हा आकडा वाढण्याचीही शक्यता आहे.

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न कोरोनाच्या परिस्थितीबाबत म्हणाल्या, “कोरोनाचे रूग्ण पुन्हा आढळल्याचं लक्षात आल्यावर ऑकलंडला बुधवारी तिसऱ्या टप्प्यातील अलर्टवर ठेवण्यात आलं आहे. यामध्ये लोकांना घराबाहेर पडण्यासा बंदी असून व्यवसायही बंद ठेवण्यात आले आहेत. इतक्या दिवसांनंतर पुन्हा कोरोनाचे रूग्ण सापडतील अशी अपेक्षा नव्हती. मात्र तरीही आम्ही याबाबत तयारी करून ठेवली होती. पुढील काही दिवस इथल्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.”

महत्त्वाच्या बातम्या-

पुण्यात घडलेल्या ‘या’ प्रकारानं पोलिसांची प्रतिमा मलीन; एका पोलिसाचं निलंबन

अंतिम वर्षाच्या परिक्षेबाबतचा ‘निकाल’ काही लागेना, सुनावणी लांबणीवर!

राज्यातील पहिल्या टेलीआयसीयु प्रकल्पाचा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते शुभारंभ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या