बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

खळबळजनक! पुण्यात कोरोना पॉझिटिव्ह बेपत्ता महिलेचा आढळला मृतदेह

पुणे | रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा मृतदेह आढळल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे. ही महिला भवानी पेठेतील होप हॉस्पिटलमधून बेपत्ता झाली होती. या महिलेचा मृतदेह आज सकाळी हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आढळला.

बायमाबी कमरुद्दीन तांबोळी असं मृत महिलेचं नावं आहे. समर्थ पोलीस ठाण्यात बायमाबी कमरुद्दीन तांबोळी बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी शोधाशोध केली मात्र पोलिसांना त्या सापडल्या नाही.

बायमाबी तांबोळी या महिलेला कोरोनाची लक्षणे होती. कोरोनाची चाचणी केल्यानंतर बायमाबी  तांबोळी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर पुण्यातील भवानी पेठेतील होप हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र दोन दिवसापूर्वी त्या अचानक रुग्णालयातून बेपत्ता झाल्या होत्या.

दरम्यान, बायमाबी तांबोळी बेपत्ता झाल्यानंतर रुग्णालय परिसरातील सीसीटीव्ही चेक करण्यात आला. त्या व्हिडीओमध्ये बायमाबी या धडपडत चालताना दिसत आहेत. खाजगी रुग्णालयातून कोरोना पॉझिटिव्ह महिला पळून जातेच कशी? रुग्णालयात पुरेशी सुरक्षा व्यवस्था नाही का?, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

थोडक्यात बातम्या- 

‘या’ कंपनीचा मोठा निर्णय; कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला देणार 2 वर्षांपर्यंत पगार

म्युकरमायकोसिस संदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती

काळजी घ्या, धोका वाढतोय! पुण्यात नव्याने कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा वाढला, वाचा आजची आकडेवारी

विनाकारण बाहेर पडणारांनो ‘हा’ व्हिडीओ पाहा, बाहेर पडायची हिम्मत होणार नाही!

सर्वात जास्त प्रभावी मानली जाणारी ‘ही’ लस भारतात दाखल, जाणून घ्या कधीपासून मिळणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More