बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ऐकावं ते नवलच! ओमिक्रॉनबाधित पहिला रूग्ण फरार

नवी दिल्ली | कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण दक्षिण अफ्रिकेत आढळून आला आहे. या व्हेरिएंटबद्दल भीती असतानाच भारतात देखील याची लागण झाली आहे. कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे दोन रूग्ण आढळले आहेत. मात्र यातील एक रूग्ण कर्नाटकमधून दुबईला पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

दक्षिण आफ्रिकेत हाहाकार माजवणारा ऑमिक्रॉन भारतात आल्यानं भारतीय यंत्रणा सावध झाली आहे. या रूग्णाचे वय 66 वर्षे असून तो अफ्रिकेतून आल्यानंतर त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. मात्र या रूग्णाला कोणताही लक्षणे दिसत नव्हती. त्याच्या घशातील द्रावाचे नमुने जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. या अहवालाचा रिपोर्ट येण्याआधीच हा रूग्ण दुबईला फरार झाला आहे.

ऑमिक्रॉनचा धोका टाळण्यासाठी भारतानं हालचाल करण्यास सुरूवात केली आहे. कर्नाटकात दक्षिण अफ्रिकेतून आलेल्या 93 जणांना ट्रॅक केले आहे. त्यापैकी दोन रूग्णांना ऑमिक्रॉनची लागण झाल्याचं समोर आलं आहे. ऑमिक्रॉनचे रुग्ण आढळल्याचे कळताच केंद्राने परदेशातून येणाऱ्या लोकांसाठी नियम अधिक कडक केले आहेत.

भारतात आल्यानंतरही आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच सक्तीच्या विलगीकरणाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शेजारच्या राज्यात रुग्ण सापडल्यामुळे आता महाराष्ट्र सरकारही सावध झालं आहे. परदेशातून आलेल्या लोकांचे ट्रेसिंग करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू असून अनेक उपाययोजना सरकार करत आहे.

थोडक्यात बातम्या-

“लोकांनी इंदिरा गांधींना ज्या पद्धतीने उत्तर दिलं, तसंच उत्तर आता मोदींनाही मिळेल”

भारतासाठी दिलासायक बातमी! Omicron विरुद्ध ‘ही’ लस ठरु शकते अधिक प्रभावी

“ममता मोदींच्या इन्फॉर्मर, त्या विरोधकांना फोडून कमकुवत करत आहेत’”

एटीएममधून पैसे काढणाऱ्यांना झटका, मोजावे लागणार इतके रूपये

…त्यातून नागपूरने 325 कोटी कमवले, काहीच टाकाऊ नसतं-नितीन गडकरी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More