Top News आरोग्य कोरोना पुणे महाराष्ट्र राजकारण

कोरोना नियमांचं उल्लंघन, भाजप नेत्यासह तिघांवर गुन्हा दाखल

Photo Credit- Twitter/ @mipravindarekar

पुणे | माजी खासदार व भारतीय जनता पक्षाचे नेते धनंजय महाडीक यांच्या मुलाचा शाही स्वागत-समारंभ सोहळा हडपसरच्या लक्ष्मी लॉन्समध्ये महाराष्ट्राच्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत पार पडला. या सोहळ्यात कोरोना नियमांचं सर्रास उल्लंघन झाल्याचं दिसून आल्यानंतर आता कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडीक यांच्यासह आणखी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात रात्री 11 ते सकाळी 6 पर्यत संचारबंदी जाहीर केली आहे. तर पुणे जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालये देखील 28 फेब्रुवारी पर्यत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर धनंजय महाडीक यांच्या मुलाच्या स्वागत समारंभात उडालेला सोशल डिस्ट्न्सिंगचा फज्जा हा कळीचा मुद्दा बनला आहे.

या सोहळ्यास महाराष्ट्रातील जवळपास सर्वच दिग्गज राजकीय नेत्यांची उपस्थिती होती. कोेरोनाचा वाढता संसर्ग आणि धोका लक्षात घेता ठराविक लोकांपेक्षा अधिक लोकांना जाणीवपूर्वक लग्न किंवा इतर सोहळ्यासाठी एकत्र केल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हडपसरच्या लक्ष्मी लाँन्समधील या सोहळ्याला शरद पवार, संजय राऊत, देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर, रामदास आठवले, चंद्रकांत पाटील, वंदना पाटील यांच्यासारख्या नेत्यांनी हजेरी लावली होती, त्यामुळे हजारोंच्या संख्येने येथे लोक उपस्थित होते.

आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 आणि महाराष्ट्र कोव्हिड-19 उपाययोजना 2020 कलम 11 तसेच इतर कलमांन्वये धनंजय महाडीक यांच्यासह लक्ष्मी लॉन्सचे मालक विवेक मगर आणि व्यवस्थापक निरूपल केदार यांच्यावर हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

थोडक्यात बातम्या –

‘…तर मला आज नातवंडे असती’; भाईजानने व्यक्त केली खंत

‘ठाकरे सरकारमधील नेत्यांना झालेला कोरोना खरा की राजकीय’; ‘या’ भाजप नेत्याची बोचरी टीका

ऑनलाईन मागवली कोल्डड्रिंक अन् बाटलीत निघाली…; तुम्हालाही वाचून बसेल धक्का!!!

शिवसेना नेते अनंत तरे यांचं निधन

आता फक्त माझी जबाबदारी म्हणून हात वर करता येणार नाहीत- नवनीत राणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या