बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आता घरबसल्या करता येणार कोरोना चाचणी; अवघ्या 325 रुपयांत होणार चाचणी

नवी दिल्ली | संपूर्ण देशभरात कोरोनाने हाहाकार माजवला असताना आता हळूहळू देशात आता कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच हेल्थ केअर या कंपनीचे प्रमुख अबॉट यांनी आता घरबसल्या कोरोना चाचणी करण्याचं किट बाजारात उपलब्ध करून देण्याबाबत मोठी घोषणा केली आहे.

अबॉट यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना घरबसल्या कोरोना चाचणी केल्यामुळे योग्य वेळेवर विलागिकरणात राहणं सोपं होईल, तसेच यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासही मदत होईल. सध्या संपूर्ण जगभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. त्याच पार्श्वभुमीवर कंपनीने रॅपिड अँटीजन चाचणी किट विकसित केले आहे.

Abott Panbio Covid-19 असं या किटचं नाव असून ते नागरिकांना आता बाजारात उपलब्ध करून दिलं जाणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. तसेच जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत तब्बल 70 लाख किट उपलब्ध करून दिले जातील असंही या कंपनी कडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, या घरबसल्या करण्यात येणाऱ्या कोरोना चाचणी किटची किंमत 325 रुपये एवढी ठरवण्यात आली आहे. तसेच यामध्ये प्रामुख्याने 1 किट, 4 किट, 10 किट आणि 20 किट अशी पॅकिंग असणार आहे. त्यापैकी एका किटसाठी 325 रुपये, 4 किटसाठी 1250 रुपये, 10 किटसाठी 2800 रुपये तर 20 किटसाठी 5400 रुपये मोजावे लागणार आहेत.

 

थोडक्यात बातम्या –

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More