बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना उपचारात आता प्लाझ्मा थेरपी नाही; ICMR आणि AIIMSचा मोठा निर्णय

नवी दिल्ली |  कोरोनावर प्रभावी औषध नसल्यानं कोरोना रूग्णांना रेमडेसिवीर आणि प्लाझ्मा थेरपीच्या माध्यमातून उपचार केले जात होते. त्यातही काही रूग्णांवर या उपचाराचा प्रभाव दिसून येत नव्हता.प्लाझ्मासाठी कोरोना रूग्णांच्या नातेवाईकांची मोठी धावाधाव होत होती. आता याच पार्श्वभूमीवर एम्स आणि आयसीएमआरने प्लाझ्मा थेरपी संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे.

कोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी वगळण्यात आली आहे. यासंदर्भात एम्स आणि आयसीएमआरने नवीन मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. आयसीएमआरच्या वतीने एक बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत कोरोना उपचारात वापरण्यात येणाऱ्या प्लाझ्मा थेरपीला उपचारातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. प्लाझ्मा थेरपी प्रभावी नसल्यानं हा निर्णय घेण्यात आला असल्याचं सांगितलं जात आहे.

‘बीजेएममध्ये प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीतून प्लाझ्मा थेरपीचा कोणताही फायदा नसल्याचं समोर आलं आहे. प्लाझ्मा थेरपी महाग आहे आणि यामुळे अनेकांमध्ये भीती वातावरण निर्माण होत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर ओझं वाढलं असूनही रुग्णांना मदत होत नाही. दात्याच्या प्लाझ्माच्या गुणवत्तेची हमी दिली जात नाही. प्लाझ्मा अँटीबॉडी पुरेशा संख्येने असणं आवश्यक आहे’, परंतु ते होईल की नाही, हे निश्चित नसतं, असं आयसीएमआरचे वैज्ञानिक डॉ. समीरन पांडा म्हणाले.

दरम्यान, काही डॉक्टर आणि वैज्ञानिकांनी मुख्य वैज्ञानिक सल्लागार के विजय राघवन यांना पत्र लिहून ती काढून टाकण्याची मागणी केली होती, तेव्हा हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, प्लाझ्मा थेरपीच्या ऑफ लेबलला परवानगी देण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या-

लॉकडाऊनमध्ये घरातच पोल डान्स करायला गेली महिला अन्…; पाहा हास्यास्पद व्हिडिओ

आता 15 मिनिटात कोरोना रिपोर्ट; ‘या’ कंपनीनं तयार केली 100 रूपयांची कोरोना चाचणी किट

पुण्याच्या विभागीय आयुक्तांना दुसऱ्यांदा झाली कोरोनाची लागण; मागच्या आठवड्यातच घेतली होती लस

दिलासादायक! मुंबईची कोरोनामुक्तीकडे वाटचाल; कोरोनामुक्तीचा दर पोहोचला 93 टक्यांवर

“कोणतीच व्हॅक्सिन शंभर टक्के संरक्षण करू शकत नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More