Corona Update: कोरोना नियमांविषयी आरोग्यमंत्र्यांनी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती
मुंबई | कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात येत आहे. त्यामुळे कोरोना नियमांमध्येही शिथिलता पहायला मिळत आहे. आता राज्य सरकारकडून लवकरच अनलाॅक होणार असल्याच्याही चर्चा सुरु झाल्या आहेत. अशातच आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे याविषयी सूचक माहिती दिली आहे.
कोरोना सध्या बऱ्याच अंशी नियंत्रणात आला आहे. त्यामुळे राज्यात लवकरच अनलाॅक करता यावा, अशी इच्छा मुख्यमंत्र्याना आहे. कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन याविषयी निर्णय घेण्यात येईल, असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
कोरोना आटेक्यात येत असेलला पाहून राज्य सरकार हळूहळू निर्बंध कमी करत आहे. मार्च महिन्यानंतर राज्यात 100 टक्के अनलॉक केला जाणार असल्याची माहिती राज्याच्या टास्क फोर्सने दिली आहे. त्यामुळे परिस्थितीचा आढावा घेत सर्वच निर्बंध 100 टक्के हटवण्यात येतील.
दरम्यान, आटोक्यात आलेला कोरोना पाहता अजून जास्त दिवस निर्बंध राहणार नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे नागरिकांनाही काहीश्या प्रमाणात दिलासा आहेच.
थोडक्यात बातम्या –
“तुमच्या कुंडल्या तुम्हालाच तुरूंगात बसून पाहाव्या लागणार, आमच्या हातात सुद्धा बरचं काही आहे”
घटस्फोटानंतर राखी सावंतच्या दुसऱ्या लग्नाची चर्चा, म्हणाली…
“रिश्ते में हम आपके बाप लगते है; ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स काय लावायचंय ते लावा”
जिओला सर्वात मोठा धक्का! तब्बल ‘इतक्या’ कोटी ग्राहकांनी सोडली साथ
मोठी बातमी! ‘या’ कारणामुळे राज ठाकरेंच्या कार्यक्रमातील स्टेज कोसळला
Comments are closed.