बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशात कोरोनाने रेकॉर्ड मोडला, काल एकाच दिवसात मिळाले तब्बल एवढे हजार रूग्ण

नवी दिल्ली | देशात कोरोनाचा धुमाकूळ सुरूच आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दरदिवशी 50 हजारांपेक्षा जास्त रूग्ण आढळून येत आहे. कालच्या दिवसांत मात्र हा आकडा अधिक पाहायला मिळाला आहे. देशात कोरोनाचं थैमान सुरू झाल्यापासून आतापर्यंतचा काल मिळालेल्या रूग्णांचा सर्वाधिक आकडा आहे. गेल्या 24 तासांत 64 हजार 399 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.

भारतातली कोरोनाबाधितांची एकूण संख्या आतापर्यंत 21 लाख 53 हजार  011 इतकी झाली आहे. तर गेल्या 24 तासांत दुर्दैवाने 861 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, अशी माहिती केंद्रिय आरोग्य विभागाने दिली आहे.

देशात सध्या 06 लाख 28 हजार 747 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 14 लाख 80 हजार 885 रूग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. दिलासादायक गोष्ट म्हणजे भारताचा रिकव्हरी रेट सुधारून आता तो 64 टक्क्यांच्या वरती गेला आहे.

 

 

दुसरीकडे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचा प्रकोप असलेला पाहायला मिळतो आहे. काल दिवसभरात 12 हजार 822 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर 1 लाख 47 हजार 48 रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

दुकान कामगार, भाजिविक्रेते यांच्याही कोरोना चाचण्या करा; केंद्र सरकारचे निर्देश

लॉकडाऊनमध्ये सोनू सूद आणि चंदीगडच्या नीतीने ९० हजार मजुरांना पोहोचवले घरी…

…म्हणून पुण्यातील ‘या’ महिला डाॅक्टरच्या वडिलांना चक्क शरद पवारांचा फोन, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More