बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Corona Update| राज्यातील सर्वाधिक कोरोना रूग्ण मुंबईतच, वाचा आकडेवारी

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून अनेक भागात कोरोनाच्या (Corona Update) आकडेवारीत चढ-उतार पाहायला मिळत आहे. कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव कमी झाला असं वाटत असतानाच कोरोनाबाधितांची वाढती आकडेवारी सर्वांचं टेंशन वाढवणारी आहे.

शुक्रवारी महाराष्ट्रात (Maharashtra) नव्याने कोरोनाचे 311 रूग्ण आढळून आले आहेत. राज्यातील कोरोनाबाधितांपैकी सर्वाधिक कोरोना रूग्ण हे मुंबईत (Mumbai) आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका अद्यापही टळला नसल्याचं चित्र दिवसेंदिवस दिसत आहे.

आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एकट्या मुंबईतीच 231 कोरोना रूग्ण आढळले आहेत. तर 20 मे रोजी कोणत्याही कोरोना रूग्णाचा मृत्यू झालेला नाही.

दरम्यान, गेल्या 24 तासांत 270 रूग्ण बरे झाले आहेत. तर सध्या 1761 कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाचा धोका अजूनही टळला नसल्याने प्रशासनाकडून सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलं जात आहे.

थोडक्यात बातम्या-

राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना आवाहन, म्हणाले…

“संजय राऊतांनी सगळी शिवसेना राष्ट्रवादीची बटीक म्हणून ठेवलीय”

शिवसेनेकडून संजय राऊत सलग चौथ्यांदा राज्यसभेवर, ‘या’ दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करणार

“भाजप देशातील नाही तर जगातील सर्वात मोठा पक्ष”

‘तुम्ही म्हणाल तेव्हा जय श्री राम म्हणायला मी काही…’, सोनू निगमचं आणखी एक वादग्रस्त वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More