बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यात गुरूवारी किती रूग्ण वाढले?; जाणून घ्या संपूर्ण आकडेवारी

मुंबई | राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या  १७ हजार ९७४ झाली आहे. आज  १२१६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज  २०७ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३३०१ रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ०२ हजार १०५ नमुन्यांपैकी १ लाख ८३ हजार ८८० जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत तर १७ हजार ९७४ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २ लाख १२ हजार ७४२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १३ हजार ४९४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात ४३ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या ६९४ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईमधील २४, पुण्यातील ७ , वसई विरार मध्ये ५, सोलापूर शहरात २, अकोला शहरात १, पालघरमध्ये १ आणि औरंगाबाद शहरात १ मृत्यू झाला आहे. याशिवाय मणिपूरमधील १ आणि बिहारमधील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबईमध्ये झाला आहे.

आज झालेल्या मृत्यूंपैकी २४ पुरुष तर १९ महिला आहेत. आज झालेल्या ४३ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २५  रुग्ण आहेत तर १४  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. ४३ रुग्णांपैकी २९ जणांमध्ये ( ६७ टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ६९४  झाली आहे.

राज्यातील विविध रुग्णालयात भरती असलेल्या ८८१६ रुग्णांचे त्यांच्या लक्षणाच्या तीव्रतेनुसार विश्लेषण केले असता पुढील निष्कर्ष समोर आले आहेत –

-या एकूण भरती रुग्णांपैकी ५२२८ ( ५९ टक्के) रुग्ण हे लक्षणे विरहित आहेत.

-३२०९ (३६ टक्के) रुग्ण हे सौम्य ते मध्यम लक्षणे असणारे आहेत. तर

-४२४ ( ५ टक्के) रुग्ण हे गंभीर स्वरुपाचे असून त्यातील २३६ ( ३ टक्के) रुग्ण ऑक्सिजनची आवश्यकता असणारे आहेत तर ९२ (१ टक्के) रुग्णांना व्हेंटिलेटरची आवश्यकता लागलेली आहे. उर्वरित ९६ रुग्ण इतर कारणांमुळे अतिदक्षता विभागात भरती आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

राज्यातील सर्व दुकाने उघडण्यास मुभा; राज्य सरकारचा मोठा निर्णय

“नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भक्तांकडे या प्रश्नाचं उत्तर आहे का?”

महत्त्वाच्या बातम्या-

दूरदर्शनच्या प्रसिद्ध निवेदिका मालविका मराठे यांचं निधन

‘या’ 14 मुद्द्यांकडे लक्ष द्या; मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीत भाजपची मागणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कार्यक्षमतेवरच देवेंद्र फडणवीस यांचं प्रश्नचिन्ह

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More