Top News आरोग्य कोरोना महाराष्ट्र मुंबई

कोरोनाच्या रुग्णसंख्येत आज धक्कादायक वाढ, लोकहो काळजी घ्या!

Photo Courtesy- Pixabay

मुंबई | गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्यानं वाढ होत असल्याचं पहायला मिळत असताना आज अत्यंत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. राज्यात कोरोना रुग्णांचा पुन्हा एकदा उद्रेक झाला असून महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 6 हजार 112 नव्या कोरोनाच्या रुग्णांची नोंद झाली आहे.

राज्यात आज दिवसभरात कोरोनामुळे 44 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता 20 लाख 87 हजार 632 इतका झाला आहे.

19 फेब्रुवारी रोजी राज्यात 6 हजार 112 नव्या रुग्णांचे नोंद झाली असून गेल्या 24 तासात 44 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.48 टक्के इतका आहे. तर दुसरीकडे आज 2 हजार 159 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनामुक्त होणाऱ्या राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 19 लाख 89 हजार 963 इतकी झाली आहे. सध्या राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.32 टक्के इतके आहे.

दुसरीकडे राज्यात सध्या 2 लाख 24 हजार 087 व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे, 1 हजार 588 व्यक्तींना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आलं आहे, अशीही माहिती राज्य सरकारने दिली आहे.

थोडक्यात बातम्या-

अर्जुन तेंडुलकर मेहनती मुलगा; अंबानींकडून सचिनच्या मुलाचं तोंडभरुन कौतुक!

“ठाकरे सरकारचे शिवजयंतीवर निर्बंध मात्र शरद पवारांच्या उपस्थितीत मटणपार्टीला परवानगी”

गुंड गजा मारणेच्या मिरवणुकीसाठी राष्ट्रवादीच्या नेत्याची गाडी!

एकत्र शिकणाऱ्या दोन मैत्रिणी पळाल्या, पोलिसांनी पकडल्यावर समोर आलं धक्कादायक कारण!

….म्हणून अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्स संघात घेतलं- माहेला जयवर्धने

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या