Top News आरोग्य कोरोना

कोरोना लशीच्या निर्मितीसाठी भारताची तयारी सुरु; केंद्राकडून ‘इतक्या’ कोटींची तरतूद

नवी दिल्ली | भारतात कोरोनाचा प्रादूर्भाव पाहता आता देशाने कोरोनाच्या लस उत्पादनावर लक्ष केंद्रीत केलंय. कोरोनाची लस ही देशातील प्रत्येक नागरिकाला लस मिळावी यासाठी केंद्राने पुढाकार घेतला असून 50 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

केंद्र सरकारकडून कोरोनाच्या लसीसाठीच्या निधीची तरतूद सध्याच्या वित्तीय वर्षाच्या शेवटी करण्यात येणार असल्याची माहिती आहे. ही तरतूद झाल्यानंतर लस निर्मितीसाठी निधी कमी पडणार नाही अशी शक्यता वर्तवण्यात येतेय.

कोरोनाच्या या लशीचा खर्च 6 ते 7 डॉलर म्हणजेच 500 रुपयांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. यासाठीच केंद्र सरकारने 7 बिलियन डॉलर म्हणजेच 50 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेतला आहे.

यापूर्वी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सर्वेसर्वा अदर पूनावाला यांनी कोरोनाची लस देण्यासाठी सुमारे 80,000 कोटी रुपयांची गरज भासणार असल्याचं सांगितलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

मनसे नेते अमित ठाकरे यांना रूग्णालयातून डिस्चार्ज

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला बलात्काराची धमकी, आरोपी गजाआड

‘…त्यात ‘डिसलाइक’ करण्यासारखं काहीच नव्हतं’; भाषणानंतर शिवसेनेचा मोदींना टोला

आजची मंत्रिमंडळाची बैठक रद्द, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कधी मिळणार मदत?

…म्हणून सीबीआयला राज्यात ‘नो एन्ट्री’- किरीट सोमय्या

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या