नवी दिल्ली | कोरोना महामारीनं जगभरात हैदोस घातला आहे. त्यामुळे सगळीकडे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अजूनही कोरोनावरील औषधांसाठी नवनवीन संशोधन चालू आहे. यातून नवनवीन माहिती समोर येत असते. अशातच आता ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमधून केल्या गेलेल्या संशोधनात आणखी धक्कादायक माहिती समोर येत आहे.
नवीन अभ्यासातून समोर येत असलेल्या माहितीत ऑक्सफोर्ड ऍस्ट्राझेनेकाच्या कोरोना लशीमुळे रक्ताच्या गुठळ्या किंवा ब्लड क्लॉटिंग होत असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे हे सगळं धोकादायक असू शकतं, असा इशारा शास्त्रज्ञांकडून दिला जात आहे. त्यामुळे सगळीकडेच चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.
नव्या अभ्यासातून समोर येत असलेली ही माहिती ‘न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’मध्ये प्रकाशित करण्यात आली आहे. ऑक्सफोर्ड ऍस्ट्राझेनेका लसीनंतर प्लेटलेट्स कमी झाल्यास किंवा रक्ताच्या गुठळ्या जास्त झाल्या तर मृत्यूचा धोका वाढतो. यासोबतच खूप कमी प्लेटलेट आणि रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्यानंतर रक्तस्त्राव होण्याचा धोका 73 टक्क्यांपर्यंत वाढतो. मात्र या केसेस एकदम क्वचित जाणवून आल्या आहेत.
दरम्यान, ऑक्सफोर्ड ऍस्ट्राझेनेकाच्या लसीकरणानंतर रोगप्रतिकारक थ्रोम्बोसाइटोपेनिया थ्रोम्बोसिसच्या (व्हीआयटीटी) पहिल्या 220 प्रकरणांचा अभ्यासातून असं दिसून आलं की व्हीआयटीटीचा मृत्यू दर 22 टक्के आहे.
थोडक्यात बातम्या –
धोकादायक! डेल्टा प्लस व्हेरिएंटचा मुंबईत पहिला बळी
‘खासदाराने माझा गळा आवळला’, मार्शलांचा गंभीर आरोप, पाहा व्हिडीओ
“मंत्री यशोमती ठाकूर यांनी 800 कोटींचा घोटाळा केला”
‘अगर आप करते रहेंगे हाऊस मे दंगा, तो कर देंगे एकदिन आपको नंगा’; आठवलेंचा विरोधकांना काव्यमय इशारा
के. एल राहुलचं दमदार शतक; तब्बल 31 वर्षांनी केला ‘हा’ विक्रम
Comments are closed.