बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कोरोनो’चा हाहाकार; पाहा आता काय घडलं!

नवी दिल्ली | कोरोना विषाणूने चीनसह 57 देशांमध्ये थैमान घातले आहे. तसेच कोरोनाचा परिणाम देशांच्या अर्थव्यवस्थेवरही उमटू लागले आहेत. कारण  शेअर बाजार घसरल्यामुळे गेल्या काही दिवसांत जगातील 500 श्रीमंत व्यक्तींचे 444 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे.

ब्लूमबर्ग संपत्ती निर्देशांक यादीतून ही बाब समोर आली आहे. जागतिक बाजारपेठेत 6 लाख कोटी डॉलर क्षणार्धात बुडाले आहेत. यातून जगातील 500 अब्जाधीशांनी या वर्षांच्या सुरुवातीपासून कमावलेला ७८ अब्ज डॉलरचा नफाही बुडाला आहे.

अ‍ॅरिसन हे जगातील सर्वात मोठय़ा क्रूझ जहाज कंपनीचे मालक मिकी अ‍ॅरिसन यांनी 1 अब्ज डाॅलर बुडाल्याचे सांगितले आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीतील अ‍ॅमेझॉनचे जेफ बेझॉस, मायक्रोसॉफ्टचे बिल गेटस्, एसव्हीएमएचचे अध्यक्ष बर्नार्ड अरनॉल्ट यांना सर्वाधिक तोटा झाला. त्यांची मालमत्ता 30 अब्ज डाॅलरनी बुडाली आहे.

दरम्यान, कोरोना विषाणूने भारतीय अर्थव्यवस्थेवरही परिणाम केला आहे. शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली आहे. तसेच गेल्या दहा दिवसात गुंतवणुकदारांचे जवळपास 10 लाख कोटी बुडाले आहेत. त्यामुळे कोरोना गंभीर परिणाम करत असल्याचं दिसत आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

महाराष्ट्रातील लेकींना भाजपच्या लोकांपासून धोका आहे- रूपाली चाकणकर

अमोल कोल्हेंनी ‘तो’ प्रण फेटा बांधून पूर्ण केला

महत्वाच्या बातम्या-

विश्वचषकातील ‘लेडी सेहवाग’ची तुफान फलंदाजी पाहून सचिन म्हणाला…

आदित्य ठाकरेंचं पर्यावरण प्रेम दिखावूपणाचं; मनसेची टीका

शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेताना काहीही अडचण येऊ देऊ नका- मुख्यमंत्री

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More