नवी दिल्ली | जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना व्हायरसने अनेक जणांचे प्राण घेतले आहेत. भारतात देखील कोरोनाने दोन जणांचे जीव घेतले आहेत. याच पार्श्वभूमीवर कोरोना व्हायरसने मरण पावलेल्या मयताच्या कुटुंबाला केंद्र सरकारने आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.
कोरोना व्हायरसने मरण पावलेल्या मयताच्या कुटुंबाला केंद्र सरकार 4 लाख रूपयांची आर्थिक मदत करणार आहे. केंद्र सरकारने तशी घोषणा केल्याचं एएनआयने म्हटलं आहे.
तसंच केंद्र सरकारने कोरोनाला आपत्ती म्हणून देखील घोषित केलं आहे. याचमुळे विविध राज्य सरकारे कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी राज्य आपत्ती निधीतून पैसे खर्च करू शकतात.
दरम्यान, देशातल्या कोरोनाबाधित रूग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. महाराष्ट्रात देखील कोरोना पॉझिटिव्ह 19 रूग्ण सापडले आहेत. तर काही संशयित देखरेखीखाली आहेत.
Ministry of Home Affairs: The government has decided to treat #COVID19 as a notified disaster for the purpose of providing assistance under the State Disaster Response Fund (SDRF). pic.twitter.com/yBTfFVmLhK
— ANI (@ANI) March 14, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
“केंद्रात गो-गो म्हणून बघा कधी तुमचा खो-खो करतील तुम्हाला पण नाही समजणार”
“मुख्यमंत्र्यांच्या पाठीचा कणा शाबूत असेल तर त्यांनी नितीन राऊतांच्या विरोधात कारवाई करून दाखवावी”
महत्वाच्या बातम्या-
“काश्मिरची प्रगती करायची असेल तर राजकीय नेत्यांना नजरकैदेतून मुक्त करा; निवडणूक घ्या”
कोरोनामुळे ‘राज गर्जना’ होणार नाही; मनसेचा मेळावा रद्द
‘दिशा’ कायदा करणारच… ठाकरे सरकारनं उचलला विडा!
Comments are closed.