बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कोरोनापासून कधीच सुटका होणार नाही, तो पूर्णपणे आपल्यातून जाणार नाही”

नवी दिल्ली | आयसीएमआरने कोरोनाबाबत महत्वाची माहिती दिली आहे. कोरोना हा इन्फ्लुएंझासारखाच एन्डेमिक  होईल. म्हणजे तो पूर्णपणे आपल्यातून जाणार नाही. त्याचा धोका कायम असेल. फ्लूसारखेच कोरोनाचे रुग्णही दिसून येतील, असं इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने सांगितलं आहे.

इन्फ्लूंएझा ज्याला फ्लू म्हणूनही ओळखला जातो. 100 वर्षांपूर्वी याची साथ आली होती. पण आता तो एन्डेमिक आहे. तज्ज्ञांच्या मते, काही काळाने कोरोना हा इन्फ्लुएंझासारखा पॅन्डेमिकवरून एन्डेमिक स्टेजवर असेल . त्यानंतर याचा सर्वात जास्त धोका असलेल्या लोकांना दरवर्षी कोरोना लस घ्यावी लागेल, असं आयसीएमआरच्या साथ आणि संसर्गजन्य विभागाचे प्रमुख समीरन पांडा यांनी सांगितलं.

सध्या उपलब्ध असलेल्या कोरोना लशी कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट्सवर प्रभावी आहे. लस ही इन्फेक्शनपासून पूर्णपणे संरक्षण देते असं नाही पण आजाराची तीव्रता कमी करते, अशी माहिती समीरन पांडा यांनी दिली.

व्हायरसमध्ये म्युटेशन होणं तसं काही नवं नाही. इन्फ्लूएंझा व्हायरसमध्येही बदल होत राहतो. आम्ही त्यानुसार लशीत थोडेफार बदल करतो. त्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही, असंही त्यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

दोन डोस घेतल्यानंतरही मृत्यू होतात, हे गांभीर्याने घ्या- अजित पवार

“मी विधानसभा अध्यक्ष होण्यास तयार, पण शिवसेनेनं वनमंत्रिपद सोडू नये”

टाटा ग्रूपच्या मालकीची टीसीएस कंपनी ‘इतक्या’ हजार फ्रेशर्सला देणार नोकरी!

नाना पटोलेंच्या खुलास्यानंतर फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी होणार; गृहमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी मी स्वत: बोलेन, पण ‘हे’ प्रकल्प वेगाने पूर्ण करा- उद्धव ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More