बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Corona: 12 वर्षांवरील मुलांसाठी आता ‘या’ लसीला मंजुरी

नवी दिल्ली | कोरोना महासाथीचा रोगानं गेल्या दोन वर्षापासून जनजीवन विस्कळीत करुन टाकलं होतं. मात्र आता कोरोना आटोक्यात येत असून परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. कोरोनाच्या या लढ्यात लसीकरणानं मोठी मदत केली आहे. अशातच लहान मुलांच्या लसीकरणासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

12 वर्षांवरील मुलांसाठीच्या Corbevax या लसीला आपत्कालीन मान्यता देण्यात आली आहे. ही लस लहान मुलांना देण्यासाठी ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) परवानगी दिली आहे.

Corbevax ही भारतात विकसित झालेली तिसरी लस आहे. आता डीसीजीआयने 12 ते 18 वयोगटातील मुलांसाठी या लशीला परवानगी दिली आहे. आता लहान मुलांसाठीही आणखी एका कोरोना लशीचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

दरम्यान, कोरोनाचा प्रभाव आता कमी झाला आहे. त्यामुळे लवकरच मास्कमुक्त देश होणार असल्याचं चित्र दिसत आहे. लवकरच सगळे निर्बंध हटवण्यात येणार असल्याचेही संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच कोरोनाचा शेवट होईल असं दिसत आहे.

थोडक्यात बातम्या – 

Weather Update: पुढील 3 दिवस ‘या’ भागात जोरदार पावसाची शक्यता

“कोण आहेत संजय राऊत? काल परवा शिवसेनेत येऊन कोणाला शिकवत आहेत”

‘कसौटी जिंदगी की’ फेम ‘हा’ अभिनेता वयाच्या 44 व्या वर्षी अडकणार लग्नबंधनात

पुरणपोळ्यांवरून राजकारण! रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला, म्हणाले…

महाराष्ट्राला कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका?, राजेश टोपे म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More