बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लॉकडाऊनमुळे ‘हा’ अभिनेता झाला बेरोजगार; पैशांसाठी विकावी लागली आवडती बाईक

मुंबई | कोरोनाचं सावट देशावर असल्यानं संपूर्ण देश चिंताग्रस्त आहे. त्यात लॉकडाऊन आणि कडक निर्बंधांमुळे सगळ्यांच्याच पोटापाण्याचा प्रश्न चव्हाट्यावर आला. सर्वसामान्यांपासून दिग्गजांच्या उद्योग-व्यवसायांना आर्थिकदृष्ट्या मोठा फटका बसला. याला सिनेसृष्टी आणि टिव्ही इंडस्ट्री देखील अपवाद नाहीत. लॉकडाऊनमुळे टिव्ही इंडस्ट्रीवर मोठा परिणाम होत आहे. टिव्ही सिरीयल्सचे शुटींग ठप्प आहेत. या स्थितीमुळे अनेक कलाकार रस्त्यावर आले आहेत. जवळची पुंजी संपल्याने अनेक कलाकारांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.

अशाच एका टिव्ही सिरियलमध्ये हनुमानाची भूमिका साकरणारा कलाकार निर्भय वाधवा गेल्या दिड वर्षांपासून बेरोजगार आहे. लॉकडाऊनमुळं कामं मिळत नसल्यानं निर्भय आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडला आहे. त्यामुळे त्याच्यावर आपली आवडती बाईक विकण्याची वेळ आली आहे.

टिव्हीवरील हनुमान निर्भय वाधवा याने आपल्या कठीण दिवसांविषयी मनमोकळी चर्चा केली. ‘जवळपास दिड वर्ष कामाअभावी घरातच बसून राहवं लागल्यानं परिस्थिती नाजूक बनली. या लॉकडाऊनच्या काळात माझी सर्व बचत संपली. काहीच काम मिळालं नाही. लाईव्ह शो देखील बंद होते. काही पगार बाकी होता, तो ही मिळाला नाही. मला फिरायची आवड आहे. त्यामुळे माझ्याकडे सुपर बाईक आहे. मात्र या परिस्थितीत मला ती विकावी लागली. ही बाईक जयपूरमधील माझ्या गावी होती. खर्च भागवण्यासाठी ही बाईक विकण्याचा निर्णय मला घ्यावा लागला. माझ्यासाठी ही बाईक विकणं हे सोपं नव्हतं. कारण ती खूप महागडी बाईक होती’, असं निर्भय वाधवा याने सांगितलं.

दरम्यान, निर्भय म्हणाला की ही बाईक मी 22 लाखांना खरेदी केली होती. त्यामुळे विक्रीसाठी खरेदीदार शोधणं अवघड होतं. शेवटी कंपनीलाच ही बाईक मी साडेनऊ लाख रुपयांना विकली. या बाईकसोबत माझ्या अनेक आठवणी आहेत. तो सध्या ‘विघ्नहर्ता गणेश’ या टिव्ही मालिकेत हनुमानाची भूमिका करत आहे. सध्या प्रत्येकजण कठीण परिस्थितीतून जात आहे. मात्र मी आशा सोडलेली नाही. माझा कर्मावर विश्वास आहे. लवकरच सगळं सामान्य होईल. मी माझं काम सुरु ठेवलं आहे आणि लवकरच अजून एक बाईक खरेदी करता यावी अशी अर्थिक स्थिती माझी असेल. जे सर्वश्रेष्ठ आहे, त्याचीच मला आशा आहे, असं निर्भय वाधवा याने बोलताना सांगितलं.

 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Nirbhay Wadhwa (@nirbhay.wadhwa)

 

थोडक्यात बातम्या –

तहान भागवण्यासाठी हत्तीने केलं असं काही की…; व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

निवडणुकीत मुंबईकर शिवसेनेला जागा दाखवून देतील- चंद्रकांत पाटील

बारावी नापास म्हणून ‘खिल्ली’ उडालेल्या मनसे नेत्यानं जिद्धीनं पूर्ण केली पदवी!

KKR ची टीम अडचणीत; ‘या’ खेळाडूंनी भारतीयांना उद्देशून केलेले जुने ट्विट्स व्हायरल

“वाघाशी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More